जळगाव, दि. ०५ – खान्देश कन्या महिला विकास मंडळाच्या वतीने मंगळवारी शहरातील रायसोनी नगरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा मंगला बारी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्त्या तथा खान्देश कन्या महिला विकास मंडळाच्या अध्यक्षा मंगला बारी यांच्या पुढाकारातून ‘मंगलम्’ या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात लहान मुलांना संस्कार आणि गोष्टीच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले याच्या स्मृतींना मान्यवरांनी उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तथा खान्देश कन्या महिला विकास मंडळाच्या अध्यक्षा मंगला बारी, नलिनी भावसार, निर्मला तेलंगे, सोनल कपोते, वंदना बारी, अन्नपुर्णा बनसोडे, शिला रगरे, वंदना पाटील, स्वाती राणा, कांचन पाटील, दिपाली गवळे, योजना सोनवणे, वृंदा कुलकर्णी, सोनाली चौधरी आदींसह रायसोनीनगर परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.