जळगाव, दि.२० – क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व धुळे जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय शालेय कॅरम स्पर्धेत मुलांच्या १४ वर्षे वयोगटात जैन स्पोर्ट्स अॅकॅडमीमधील कॅरमपटू यश योगेश धोंगडे याने प्रथम, तर महमंद हमजा द्वितीय व पाचवे स्थान प्राप्त करीत विभागीय कॅरम स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले.
१४ वर्षे वयोगटातील विभागीय कॅरम स्पर्धा धुळे क्रीडा संकुल येथे १६ डिसेंबर ला झाल्यात. या स्पर्धेत १४ वर्षे जैन स्पोर्ट्स अॅकॅडमी व आर. आर. विद्यालयाचा विद्यार्थी यश योगेश धोंगडे याने धुळे येथील अबुजर अन्सारी या अंतिम फेरीत २५-० असा सरळ पराभव करीत विजेतेपद प्राप्त केले. अबुजर अन्सारीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यश धोंगडे याने आपल्या खेळ कौशल्याच्या जोरावर स्पर्धेत शेवटपर्यंत आपली पकड कायम ठेवली. त्याने उपान्त फेरीत जैन स्पोर्ट्स अॅकॅडमी व जि. एच. रायसोनीच्या कार्तिक हिरे याचा देखील २५-४ असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
१४ वर्षे वयोगात जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार विभागातील ४८ कॅरमपटूंनी सहभाग घेतला होता. त्यात जळगाव येथीन जैन स्पोर्टस अॅकॅडमीतील योगेश घोंगडे, कार्तिक हिरे तृत्तीय तर महमंद हमजा पाचवे स्थान प्राप्त करून प्रथमच प्रथम, विभागीय स्पर्धेत जळगावचे नाव रोशन केले. वरील सर्व यशस्वी जळगाव येथील कॅरमपटूंना घडविण्याचे व यशस्वतिपर्यंत पोहचविण्याचे कार्य ॲकॅडमीतील प्रशिक्षक योगेश धोंगडे व सय्यद मोहसनी यांनी लिलया पेलले. विजयी खेळांडूपैकी यश योगश धोंगडे याला धुळे कॅरम संघटनेतर्फे ट्रॉफी देऊन विशेष कौतुक व गौरविण्यात आले. जैन स्पोर्ट्स अॅकॅडमीतीक विभागीय स्पर्धेत स्थान प्राप्त करणाऱ्या यश, कार्तिक, हमजा या खेळाडूंचे अभिनंदन जैन स्पोर्टस अॅकॅडमीचे अतुल जैन, अरविंद देशपांडे यांनी केले व राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्यात.