जळगाव, दि.१९ – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाच्या शरीररचना शास्त्रविभागात आज प्रथम वर्ष विद्यार्थ्यांना मृत शरीराची हेळसांड न करण्याची शपथ देण्यात आली.
मृत शरीराला सन्मान मिळावा तसेच अभ्यासासाठी मिळालेले या शरीराचा अभ्यासासाठी उपयोग करू तसेच देहदानातून प्राप्त शरीराची हेळसांड न होवू देता त्या शरीराला सन्मान मिळवून देण्यासाठी शपथ देण्यात आली.
दरम्यान उपस्थित मान्यवरांनी शरीररचना शास्त्र विषयाचा अभ्यास करतांना करावयाचे नियोजन व याची व्याप्ती तसेच वेळेचे नियोजन या बाबत मार्गदर्शन केले. यावेळी शरीररचना शास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.अमृत महाजन, प्रा.डॉ शुभांगी घुले, प्रा.डॉ.अनिता फटींग, प्रा.डॉ.अनिल पुंगळे, प्रा.डॉ.जमीर हे उपस्थीत होते.