• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सुवर्ण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोझलॅण्ड स्कुलतर्फे विविध उपक्रम

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 14, 2022
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
सुवर्ण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोझलॅण्ड स्कुलतर्फे विविध उपक्रम

जळगाव, दि.१४ – येथील न्यू एरा एज्युकेशन सोसायटी संचालित रोझलॅण्ड इग्लीश मिडीयम स्कुल पन्नासाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. शाळेच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने संस्थेने विविध उपक्रमांची आखणी केली आहे, असे संस्थेच्या अध्यक्षा रोझमीन खिमाणी प्रधान यांनी बुधवारी जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.

त्या पुढे म्हणाल्या की, सुवर्णमहोत्सवी वर्षात रोझलॅण्ड ग्रुप ऑफ इन्स्टीट्यूट व रोझलॅण्ड अॅकेडमीच्या माध्यमातून अनेक उपक्रम भारतातही सुरु करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत या अॅकेडमीच्या माध्यमातून अमेरीकेत काही उपक्रम राबविण्यात येतात. त्यातीलच एका व्हॉलेंटियर उपक्रमातंर्गत अमेरिकेतील विद्यार्थी है दरवर्षी ३ महिन्यांसाठी भारतात येऊन, जळगावात मुक्कामी राहून येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन, त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष देतील.

अमेरिकेत राबविण्यात येणारा आयबी प्रोग्रामसुद्धा जळगावातील रोझलॅण्ड शाळेतील स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमात अंशतः राबविण्यात येणार आहे. जेणेकरुन प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणात ते उपकारक ठरेल.

या उपक्रमात आयबी प्रणालीत पदवी संपादन केलेल्या सौ. खिमाणी यांची कन्या सानिया रोझ प्रधान यांनी पुढाकार घेतला आहे. सानिया प्रधान या योगा इन्स्ट्रक्टर व फ्रेंच भाषेतील पदवीधर आहेत. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, कौशल्य आणि त्यांच्यातील सुप्त कलागुणांचा विकास घडविण्याकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाणार आहे. शालेय अभ्याक्रमासोबतच विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती हा प्रमुख हेतू या उपक्रमांमागे असल्याचे सौ. खिमाणी यांनी सांगीतले. संस्थेचे सल्लागार व हैदराबाद येथील EFL विद्यापीठाचे माजी कुलगुरु २००७ पासून अमेरिकेतील अॅटलांटा येथे स्थायिक असलेले डॉ. व्ही. गणेशन हे देखील शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत.

सन १९७४ मध्ये स्व. डी. एस. खिमाणी मॅडमने न्यू एरा एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्याकाळी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सहज उपलब्ध व्हावे या हेतूने सुरु झालेल्या संस्थेच्या वाटचालीत आजवर अनेकांचे सहकार्य लाभले आहे. सुरुवातीला एका झाडाखाली अवघ्या १७ विद्यार्थ्यांना घेऊन सुरु झालेल्या या शाळेचा आज वटवृक्ष निर्माण झाला आहे. खिमाणी मॅडमच्या पश्चात त्यांचे पती स्व. एस. पी खिमाणी यांनी संस्थेचे कामकाज बघितले. आज इंग्रजी माध्यमासोबतच मराठी माध्यमातील रोझलॅण्ड प्राथमिक विद्यामंदीरही संस्थेतर्फे चालविण्यात येते.

शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या या शाळेतून शिकून अनेक विद्यार्थी संपूर्ण भारतात व विदेशात मोठमोठ्या पदांवर पोहचले आहेत. त्यांचे सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने २४ डिसेंबर २०२३ ला आयोजित करण्यात येणाऱ्या संमेलनासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

Next Post
भारतीय किसान संघातर्फे दिल्ली येथे किसान गर्जना रॅली

भारतीय किसान संघातर्फे दिल्ली येथे किसान गर्जना रॅली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव येथे राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’ला प्रारंभ
जळगाव जिल्हा

जळगाव येथे राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’ला प्रारंभ

February 4, 2023
लाडवंजारी समाज बांधवांची राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी घेतली भेट
जळगाव जिल्हा

लाडवंजारी समाज बांधवांची राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी घेतली भेट

February 4, 2023
कजगाव ग्रामपंचायतीकडून दिव्यांग तरुणींना सायकल वाटप
जळगाव जिल्हा

कजगाव ग्रामपंचायतीकडून दिव्यांग तरुणींना सायकल वाटप

February 3, 2023
शिवसेना (ठाकरे गट) महिला आघाडीची बैठक संपन्न
जळगाव जिल्हा

शिवसेना (ठाकरे गट) महिला आघाडीची बैठक संपन्न

February 2, 2023
कृषिक्षेत्रासाठी अर्थसंकल्पाची सप्तर्षी.. – अशोक जैन अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.
जळगाव जिल्हा

कृषिक्षेत्रासाठी अर्थसंकल्पाची सप्तर्षी.. – अशोक जैन अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

February 1, 2023
मनसेच्या ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
जळगाव जिल्हा

मनसेच्या ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

January 31, 2023
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

कॉपी करू नका.