जळगाव, दि. ०५ – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जळगाव महानगर तर्फे आकाशवाणी चौकातील पक्ष कार्यालयाबाहेर खासदार रावसाहेब दानवे आणि आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल एकेरी भाषा वापरल्याबद्दल तसेच जातीय तेड निर्माण करण्याचा भारतीय जनता पार्टीचा हेतू असल्याचा आरोप करण्यात आला.
आंदोलनाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रावसाहेब दानवे व प्रसाद लाड यांच्या पुतळ्याला जोडे मारून फाशीवर लटकवण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी बेताल वक्तव्य करणे बंद न केल्यास त्यांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही असा इशारा देखील देण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस नामदेव चौधरी, महानगरअध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवकअध्यक्ष रिकु चौधरी, राजू मोरे, मझर पठाण, इब्राहिम तडवी, रमेश बहारे, रहीम तडवी, भगवान सोनवणे, रफिक पटेल, कुंदन सूर्यवंशी, अशोक सोनवणे, विशाल देशमुख, अनिरुद्ध जाधव, दुर्गश पाटील, ललित नारखेडे, खलील शेख, नईम खाटीक, प्रवीण सुरवाळे, संजय जाधव, उमेश सूर्यवंशी, जुबेर शेख, सचिन साळुंखे, हितेश जावळे, योगेश साळी आदींसह पदाधिकारी कार्यकते उपस्थित होते.