चाळीसगाव, दि. ०५ – जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून शनिवारी चाळीसगाव येथील स्वयंदीप दिव्यांग संस्थेमध्ये दिव्यांगांसाठी प्रेरणास्थान असलेल्या हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करून चाळीसगाव येथील दिव्यांग मित्र आरोग्यदूत सामाजिक कार्यकर्ते वर्धमान धाडीवाल व सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप घोरपडे यांनी साजरा केला.
यावेळी दिव्यांग बंधू आणि भगिनींना रोजगार उपलब्ध करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणाऱ्या स्वयंदीप संस्थेच्या संस्थापिका मीनाक्षी निकम यांना पुष्पगुच्छ देऊन दिव्यांग मित्र वर्धमान धाडीवाल यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच दिव्यांग भगिनी भारती चौधरी, शारदाताई, छायाताई, सोनीताई, करुणाताई, शालूताई आणि जयश्रीताई यांनाही शुभेच्छा देल्या.
यावेळी दिव्यांग भगिनी आणि बांधव यांच्यासाठी पुढील नियोजन करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांविषयी चर्चा करून दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला.