जळगाव, दि. १० – कै.अण्णासाहेब पाटील यांनी १९८१ साली अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना केली. मराठा समाजाची शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उन्नती व्हावी हि मूळ संकल्पना होती. मराठा समाजाची अत्यंत मोठी व जुनी सामाजिक संघटना म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाची ओळख आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जळगाव जिल्हा संघटक पदी देवेंद्र मराठे यांची एकमताने निवड करण्यात आली. विद्यार्थी चळवळीपासून ते युवकांचे प्रतिनिधित्व करण्यामध्ये देवेंद्र मराठे यांचे कार्य परिचित आहे. मराठा समाजामध्ये समाजाचा आरक्षणाचा मुद्दा असो किंवा समाजाचे विविध प्रश्न असो यावर वेळोवेळी आवाज उठवण्याचे काम देवेंद्र मराठे हे करीत आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रमुख एड.शशिकांत पवार यांनी सामाजिक व राजकीय चळवळी मध्ये काम करीत असलेले त्याच पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने कुशल संघटन करून समाजाच्या युवक-युवतींना व बांधवांना एकत्र आणून समाजाचे विविध प्रश्न सोडवण्याचे काम करण्याकरता व समाजाची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उन्नती व्हावी या हेतूने देवेंद्र मराठे यांची जिल्ह्याच्या संघटक पदी निवड केली.
आज निवडीचे पत्र मराठा महासंघाचे उद्योजक व व्यापारी संघाचे माननीय सुदाम पाटील मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ बी बी भोसले यांच्या हस्ते जळगाव येथे देण्यात आले. या निवडीचे अखिल भारतीय मराठा महासंघ शशिकांत पवार, दिलीप जगताप, कविता भोसले, रणजित जगताप, सुदाम पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ बी बी भोसले, केतन पाटील, कृष्णा पाटील, भगवान पाटील तसेच जिल्हा भरातील सर्व समाजाचे नेते, व समाज बांधवांनी अभिनंदन केले.