• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मुख्यमंत्रींच्या हस्ते पाणी पुरवठा योजना व विश्रामगृहच्या इमारतीचे लोकार्पण

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 21, 2022
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
मुख्यमंत्रींच्या हस्ते पाणी पुरवठा योजना व विश्रामगृहच्या इमारतीचे लोकार्पण

जळगाव, दि.२१ – पाळधी येथे महाराष्ट्रातील पहिल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या २२ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे ई- भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. तसेच शासकीय विश्रामगृहाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, खासदार उन्मेष पाटील आमदार चिमणराव पाटील, आमदार सुरेश भोळे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया आदी उपस्थित होते.

यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धरणगाव येथे ट्रामा केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालय उभारावे, अशी मागणी केली असता सदर ट्रामा केअर उभारण्या बरोबरच इतर आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी भरीव निधीची तरतुद करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. पाळधी गावात ५० खाटांचे ट्रामा सेंटर, पाळधी पोलीस स्थानक, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने भव्य उद्यानाची उभारणी करणे, असोदा येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक उभारणे, तसेच इतर विकास कामांसाठी देखील सर्वतोपरी आर्थिक मदत करण्यात येईल. तसेच कोळी समाजाचे प्रश्न देखील प्राधान्याने सोडविले जातील असे त्यांनी यावेळी सांगितले.

Next Post
संतप्त विद्यार्थ्यांनी गाठले आमदार कार्यालय

संतप्त विद्यार्थ्यांनी गाठले आमदार कार्यालय

ताज्या बातम्या

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट
खान्देश

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

September 12, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 12, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर
कृषी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

September 12, 2026
राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
जळगाव जिल्हा

राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन

September 12, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक

September 12, 2026
१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट
Uncategorized

१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट

September 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add