फराज अहमद | चोपडा, दि.१८ – तालुक्यातील विधानसभा मतदारसंघाच्या आमदार लता सोनवणे यांच्या विरोधात लागलेल्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर, मागील काळात शिंदे गटाकडे पत्नीसह गेलेले माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांची शिवसेना रावेर लोकसभा सहसंपर्क प्रमुख पदावरुन उचलबांगडी होऊन डॉ.मनोहर पाटील यांची नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सामना पत्रकातुन जाहीर करण्यात आली.
डॉ.मनोहर पाटील हे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक असुन गेल्या ३७ वर्षांपासून जामनेर तालुक्यात शिवसेनेची धुरा सांभाळत आहेत. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत जिल्हात सर्वात कमी मतांनी पराभूत होऊन १९९५ विधानसभेला शिवसेना-भाजपा युतीत विधानसभेचे टिकीट कापले तरीही आज पर्यंत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आणि उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाशी एकनिष्ठ राहिल्याने त्यांच्या निष्ठेची पावती त्यांना मिळाली. यामुळे जामनेर सह रावेर लोकसभा मतदारसंघातील निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये उत्साह दिसून आला.