लालसिंग पाटील | भडगाव, दि. ०८ – तालुक्यातील कजगाव येथे श्री चक्रधर स्वामी रेल्वे उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा गुरूवारी जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेश पाटील आणि पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
भाजप शिवसेना युती व्हावी ही चक्रधर स्वामींची देखील ईच्छा होती त्यामुळे शिवसेना व भाजपच्या युती सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामाचे लोकार्पण पुन्हा आज युती सरकारच्याच काळातच झाले. त्यामुळे शिवसेना भाजप युती सरकार येणे गरजेचे होते असे वक्तव्य आमदार किशोर पाटील यांनी केले. ते रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
खासदार उन्मेष पाटील यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनेबाबतची माहीती दिली तसेच इतिहासात पहील्यांदाच रेल्वेच्या तिसऱ्या लाईनचे काम चालू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार उन्मेष पाटील, आमदार किशोर पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख मनोहर पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पी. पी. सोनवणे, डॉ विशाल पाटील, राजेश पाटील, संजय पाटील, राजू परदेशी, कैलास पाटील रामकृष्ण पाटील, रावण नाईक, युवराज पाटील, वसंत पाटील, पुरुषोत्तम माळी, दिनेश पाटील, अनिल महाजन आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
VIDEO
खान्देश प्रभात न्युज