जळगाव, दि.१४ – भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश मार्फत देण्यात आलेल्या निर्देशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर च्या वतीने मोटार सायकल मशाल रॅली काढण्यात आली. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालयापासुन सुरुवात करण्यात आली.
मोटार सायकल रॅली रिंग रोड मार्गे कोर्ट चौक, नेहरू चौक, रेल्वे स्टेशन, टॉवर चौक, महात्मा गांधी मार्केट, सुभाष चौक, चित्रा चौक, कोर्ट चौक या मार्गाने जात महात्मा गांधी उद्यान येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीचा समारोप करण्यात आला.
रॅली मार्गादरम्यान येणाऱ्या महाराणा प्रताप, बहिणाबाई चौधरी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज या सर्व राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना देखील पुष्पहार अर्पण करून पुष्पवृष्टी करण्यात आली. दरम्यान रॅलीत सुमारे २०० हुन अधिक मोटारसायकल धारकांनी सहभाग घेत कार्यकर्त्यांच्या हातात मशाल व राष्ट्रध्वज होते. यावेळी कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा दिल्या.
रॅलीत महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश सरचिटणीस नामदेव चौधरी, प्रदेश चिटणीस एजाज मलिक, माजी नगरसेवक राजू मोरे, युवक अध्यक्ष रिंकू चौधरी, डॉ. रिजवान खाटीक, मजहर पठाण, रमेश बहारे, इब्राहिम तडवी, सुशील शिंदे, किरण राजपूत, रहीम तडवी, संजय जाधव, हितेश जावळे, राहुल टोके, अनिल पवार, किरण चव्हाण, शालिनी बनसोडे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते सहभागी झाले.