जळगाव, दि. १४ – देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने देशभर विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याच अनुषंगाने जळगांव जिल्हा पोलीस दल व जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवारी अमृत दौडचे आयोजन करण्यात आले.
दौडची सुरुवात काव्यरत्नवली चौक येथून करण्यात आली. या वेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, सहायक पोलीस अधीक्षक(गृह) संदीप गावित, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
काव्यरत्नवली चौक येथे झुंबा, योग करीत मान्यवरांच्या हस्ते तिरंगी फुगे हवेत सोडून अमृत दौडला सुरुवात करण्यात आली. दौड मध्ये सुमारे पाच हजार नागरिकांनी सहभाग नोंदविला. उत्स्फूर्त प्रतिसादाने दौड काव्यरत्नवली चौक- आकाशवाणी चौक- स्वातंत्र चौक- छत्रपती शिवाजी पुतळा- नेहरू चौक- शास्त्री टॉवर चौक- चित्र चौक- शिवाजी पुतळा मार्गे काव्यरत्नवली चौक येथे दौड संपन्न झाली.