जळगाव, दि.०१ – ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशनतर्फे महापौर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन जळगावात करण्यात आले आहे. दि.१३, १४ आणि १५ ऑगस्ट २०२२ रोजी हा कार्यक्रम होणार आहे. दि.१३ आणि १४ रोजीचा कार्यक्रम शहरातील व वाचनालयाच्या नवीन सभागृहात होणार असून दि. १५ रोजीचा कार्यक्रम महाबळ रोड वरील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात होणार आहे. अशी माहिती आयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आले. यावेळी महापौर जयश्री सुनील महाजन, ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशनचे अध्यक्ष तथा जेष्ठ कलावंत मोहन तायडे , सचिव तुषार वाघुळदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील कलावंतांना कोरोना महामारीमुळे आपली कला सादर करण्याची त्यांना संधी मिळाली नव्हती, तसेच नृत्य, गायक, वादक यासह इतर कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी काही कलावंतांनी महापौर यांच्याकडे कल्पना मांडली , आणि महापौर जयश्री सुनील महाजन यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सांस्कृतिक महोत्सवात दि.१३ ऑगस्ट रोजी शनिवारी सकाळी १०:३० वाजता व.वा. वाचनालय, रेल्वे स्टेशन रोड येथील नवीन सभागृहात सोलो डान्स (१२ वर्षाखालील मुले / मुली ) , सोलो डान्स १३ वर्षांखालील मुले / मुली तसेच समूह नृत्य स्पर्धा ( ग्रुप डान्स ) खुला गट अशा स्पर्धा होतील . सायंकाळी ६ वाजता ( ब्लॅक अँड व्हाईट ) चित्रपटातील गाण्यांचा बहारदार कार्यक्रम होईल.
दि.१४ ऑगस्ट रविवार रोजी व. वा. वाचनालय रेल्वे स्टेशन रोड येथील सभागृहात सकाळी १०:३० वाजता गीतगायन स्पर्धा खुला गट (करावोके) तर दुपारी २ ते ४ या वेळेत ‘ द ग्रेट मॉम (केवळ महिलांसाठी) नृत्य स्पर्धा होतील. याच दिवशी सायंकाळी ६ वाजता भारतरत्न गानकोकीळा स्व . लता मंगेशकर यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम होईल. दि.१५ ऑगस्ट सोमवारी सकाळी ११ वाजता ‘आझादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाअंतर्गत देशभक्तीपर गीतगायन कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम महाबळ कॉलनी रोडवरील छत्रपती राजे संभाजी नाट्यगृहात होईल. या सांस्कृतिक महोत्सवात जिल्ह्यातीलच नव्हे तर खान्देश , विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील अनेक कलावंत सहभागी होणार आहेत.
प्रवेशासाठी जोशी स्पोर्ट्स, नवीपेठ जळगाव तसेच ९८६०३०३८८८, ९४०५०५७१४१, 8669343415 ८६६९३४३४१५ तसेच ९४२३४८७६५३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.