पाचोरा, दि. २८ – गेल्या काही दिवसात तालुक्यात पावसाची संततधार सुरू होती. पावसामुळे शेतीचे कामेही खोळंबली आहेत आणि त्यामुळे पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान शेतकऱ्यांना त्वरित सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी पाचोरा काँग्रेसचा वतीने तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली असून यावेळी पाचोरा तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
पाचोरा काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वात तहसिल कार्यालया समोर ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशा विविध घोषणाबाजी करत निवेदन देऊन धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी पाचोरा तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शहराध्यक्ष अॅड अमजद पठाण, युवक जिल्हा उपाध्यक्ष अंबादास गिरी, ओबीसी तालुकाध्यक्ष इरफान मनियार, शहराध्यक्ष शरिफ शेख, महिला जिल्हा काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस संगिता नेवे, कुसुम पाटील, सुनिता पाटील, कल्पना निंबाळकर, अमजद मौलाना, शिवराम पाटील, सय्यद ईसुफ टकारी, बिस्मिल्ला टकारी, शंकर सोनवणे, ललित पुजारी, जलील शहा, कल्पेश येवले, राहुल शिंदे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात उपस्थित होते.