• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दोन हजारांची लाच स्वीकारताना तहसीलचा कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 28, 2022
in जळगाव जिल्हा
0
दोन हजारांची लाच स्वीकारताना तहसीलचा कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

जळगाव, दि.२८ – संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव तहसील कार्यालयातील शिपाई मगन गोबा भोई यास बुधवारी जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. दरम्यान या कारवाईने महसूल प्रशासनातील लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली.

सविस्तर वृत्त असे की, जळगावातील ३५ वर्षीय तक्रारदार या घटस्फोटीत आहे. त्यांच्या आई विधवा असल्याने त्यांनी संजय गांधी योजनेचा लाभ मिळण्यासाठी जळगावातील रेल्वे स्थानकाजवळील नगरपालिका क्षेत्र कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजनेखाली अर्थसहाय्य मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यास बराच कालावधी झाल्याने तक्रारदाराने कार्यालय गाठून भोई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तक्रारदारासह त्यांच्या आईच्या नावे अनुदान मंजुर करून आणून देतो असे सांगितले.

दरम्यान आईचे अनुदान मंजूर करण्यासाठी तीन हजार तर तक्रारदाराच्या अनुदानासाठी दोन हजार मिळून एकूण पाच हजार रूपयांची लाच मागितली मात्र दोन्ही प्रकरणात तडजोड होवून चार हजार देण्याचे ठरले व प्रथम तक्रादाराच्या आईचे अनुदान मंजुर करून आणून देण्यासाठी दोन हजार रुपये मागितले. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केल्यानंतर लाच लुचपत विभागाच्या वतीने पडताळणी करून संबंधित शिपाई मगन गोबा भोई याच्यावर कारवाई करण्यात आली.

जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील, निरीक्षक संजोग बच्छाव, निरीक्षक एन.एन. जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, जनार्धन चौधरी, सुनील शिरसाठ, बाळू मराठे, प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, नासीर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ, राकेश दुसाने, सचिन चाटे, प्रणेश ठाकुर, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने सापळा रचून यशस्वी कारवाई केली.

Next Post
पाचोऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करा ; कॉंग्रेसची मागणी

पाचोऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करा ; कॉंग्रेसची मागणी

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता

September 10, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add