• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे पिक विमा जनजागृती रथयात्रा

दहा दिवसात तालुक्यातील १५४ गावांत करणार जनजागृती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 19, 2022
in जळगाव जिल्हा
0
मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे पिक विमा जनजागृती रथयात्रा

गजानन पाटील  | अमळनेर, दि.१९ – येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे ग्रामीण भागात पिक विमा जनजागृती रथयात्रा मंगळवारी काढण्यात आली. तालुक्यातील नागरिकांमध्ये पिक विमा बाबत जनजागृती करण्यासाठी ही रथयात्रा काढण्यात आली असून १० दिवसांत तालुक्यातील १५४ गावांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले व तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक येथील प्रगतिशील शेतकरी अजयसिंग पाटील यांनी रथाचे विधिवत पूजन केले. तसेच खजिनदार गिरीश कुलकर्णी व कृषी विभागाचे दीपक चौधरी यांनी मंगळदेव ग्रह मंदिराचा भगवा ध्वज दाखवून रथयात्रेला सुरवात केली. यावेळी सुरूवातीला काही अंतरापर्यंत सवाद्य मिरवणूक देखील काढण्यात आली. संस्थेतर्फे दरवर्षी शेतकऱ्यांच्या कल्याणार्थ तथा मार्गदर्शनार्थ अनेकविध कार्यक्रम राबविले जातात.

पीक विम्या विषयी अजूनही शेतकऱ्यांमध्ये फारसा जनजागर नाही. पीक विम्याच्या फायद्यांबाबत त्यांना फारशी माहिती नाही. शेतकऱ्यांना ही माहिती व्हावी , दुर्दैवाने शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास त्यांना भरपाई मिळावी, यासाठी जनसेवार्थ रथाचे आयोजन केले आहे. कृषी विभाग यासाठी संस्थेला सहकार्य करीत आहे.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष एस.एन. पाटील, सचिव एस.बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, सेवेकरी विनोद कदम, सुबोध पाटील, कृषी कार्यालयाचे नवल पाटील आदी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते आशिष चौधरी यांनी रथासाठी त्यांचे वाहन उपलब्ध करून दिले.

Next Post
आपल्या श्वासाप्रमाणे झाडे जपा – न्या. ए. ए. शेख

आपल्या श्वासाप्रमाणे झाडे जपा - न्या. ए. ए. शेख

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add