जळगाव, दि. १६ – मु.जे.महाविद्यालयाच्या तत्वज्ञान विभागातर्फे एकदिवसीयशव्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘शंकराचार्यांचा अद्वैत वेदांत’ ह्या विषयावर ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून व्याख्यानांचे आयोजन केले गेले. याप्रसंगी ऑनलाईन माध्यमातून विशेष अतिथी नवी दिल्ली येथील भारतीय दार्शनिक अनुसंधान परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.आर.सी. सिन्हा, ऑफलाईन माध्यमातून मुख्य वक्ते रामटेक नागपूर येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे प्रा.डॉ. मधुसूदन पेन्ना, ऑनलाईन माध्यमातून वाराणसी, पटना येथील धर्म एवं दर्शनशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. आनंद मिश्रा, बनारस हिंदू विश्वविद्यालय विद्यापीठाच्या माजी विभाग प्रमुख डॉ. पुनम सिंह यांनी मार्गदर्शन केले.
या मुख्य वक्त्यांनी आदि शंकाचार्यांनी सांगितलेला मायावाद, अविद्या, अद्वैत वेदांत या संकल्पनांचे विशेष विवरण केले. मुळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.स.ना.भारंबे, भाषा प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.बी.एन. केसुर, सामाजिक शास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. देवेंद्र इंगळे, योग आणि नॅचरोपॅथी विभागाचे संचालक प्रा.डॉ.देवानंद सोनार , नॉलेज आणि रिसर्च सेंटरचे संचालक प्रा.डॉ.व्ही.एस. कंची या मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.
याप्रसंगी मानवी मूल्य प्रशाळेच्या संचालिका व तत्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. रजनी सिन्हा यांनी विषय प्रवर्तन केले. संस्कृत विभागाचे प्रा.डॉ.अखिलेश शर्मा यांनी सूत्रसंचालन, मंगलाचरण आणि आभारप्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.राजश्री पाटील व प्रा.अमोल पाटील यांनी विशेष प्रयत्न केले, याप्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रसारण संगणक विभागाच्या प्राध्यापकांनी यशस्वीरीतीने पूर्ण केले.