• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पालिका निवडणुकीसाठी आ.अनिल पाटलांच्या गटाकडून ईच्छूक उमेदवारांची चाचपणी सुरू

मविआ ला सोबत घेऊन शहर विकास आघाडी रिंगणात येण्याची शक्यता !

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 11, 2022
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
पालिका निवडणुकीसाठी आ.अनिल पाटलांच्या गटाकडून ईच्छूक उमेदवारांची चाचपणी सुरू

गजानन पाटील | अमळनेर, दि. ११ – नगरपरिषदेची निवडणूक मोठ्या ताकदीने लढण्याचे संकेत आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिले असून यादृष्टीने इच्छुक उमेदवारांची चाचपणी व नोंदणी देखील आमदारांच्या गटाकडून सुरू झाली आहे. सद्याची परिस्थिती लक्षात घेता महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून व स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन शहर विकास आघाडी रिंगणात उतरविण्याचे संकेत दिसत आहेत.

आमदार अनिल पाटील यांच्यासोबतच माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील हे दोन्ही नेते शहर विकास आघाडीचे नेतृत्व करतील अशी माहिती देखील अधिकृत सूत्रांकडून मिळाली असून महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि शहर विकासाच्या दृष्टीने सोबत येणारे इतर पक्षांचे मान्यवर आघाडीच्या निवडणूक समितीत असतील असेही संकेत आमदारांच्या गटाकडून दिले गेले आहेत, मात्र याबाबत अधिकृत घोषणा बैठकीतील निर्णयानंतर होणार असल्याचे समजते.

निवडणूक आयोगाने पालिका निवडणूकिचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर यासंदर्भातील हालचाली गतिमान झाल्या असून जास्तीतजास्त गोपनीय बैठकांवर भर दिला जात आहे. निवडणूक आयोगाने अचानक १८ ऑगस्ट मतदानाची तारीख जाहीर केल्याने थोडी धावपळ होत असली तरी लवकरच आमचे निवडणुकीचे धोरण निश्चित होऊन दमदार उमेदवारांचे पॅनल रिंगणात उतरलेले दिसेल असा विश्वास स्वतः आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केला. आणि महाविकास आघाडी सरकार बरखास्त झाले असले तरी महाविकास आघाडी मात्र जैसेथेच असून सर्व घटक पक्षांबाबत न्यायाची भूमिका घेऊन योग्य तो निर्णय होणार असल्याने सरकार बदलाचा कोणताही फरक याठिकाणी पडणार नाही, इतर पक्षाची चांगली मंडळी आणि तुल्यबळ इच्छुक उमेदवार देखील आमच्यासोबत जुळण्यास इच्छुक असून निवडणूक लढविणार ती संपूर्ण ताकदीनेच आणि सत्ताही येणार ती आमचीच! असा ठाम विश्वास आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केला आहे. व मुख्यमंत्रीच्या वक्तव्यानुसार निवडणूक पुढे जावो किंवा आता होवो आम्ही कधीही तयार आहोत असेही त्यांनी दाव्याने सांगितले आहे.

▪️ईच्छूक उमेदवारांचे अर्ज होताहेत प्राप्त..
निवडणूक आयोगाच्या आदेशाने पालिका निवडणूक लागल्याने आमदार अनिल पाटील यांच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त होऊ लागले असून प्रत्येक प्रभागातून अनेकांचे अर्ज येत आहेत, सदर अर्ज दि.१३ जुलै नंतर गठीत होणाऱ्या समितीसमोर ठेऊन विजयश्री गाठू शकणाऱ्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी माहिती आमदारांच्या वतीने देण्यात आलेली आहे.

 

Next Post
भाग्यश्री पाटीलने रचला इतिहास ; चौथ्यांदा राष्ट्रीय बुद्धिबळात विजेती

भाग्यश्री पाटीलने रचला इतिहास ; चौथ्यांदा राष्ट्रीय बुद्धिबळात विजेती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन शिबिर
जळगाव जिल्हा

अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन शिबिर

June 2, 2023
उच्च तंत्रज्ञानामुळेच शाश्वत शेतीचा मार्ग; शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांचा सुसंवाद
कृषी

उच्च तंत्रज्ञानामुळेच शाश्वत शेतीचा मार्ग; शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांचा सुसंवाद

June 1, 2023
महिलेच्या पोटातून काढला साडेसात किलोचा गोळा !
आरोग्य

महिलेच्या पोटातून काढला साडेसात किलोचा गोळा !

June 1, 2023
निर्माल्य आता घंटागाडीत नव्हे तर निर्माल्य संकलन वाहनात द्या
जळगाव जिल्हा

निर्माल्य आता घंटागाडीत नव्हे तर निर्माल्य संकलन वाहनात द्या

May 31, 2023
कृषी क्षेत्रातील भविष्याचे नायक म्हणजेच ‘फाली’च्या ९ व्या संमेलनाचे आयोजन
कृषी

कृषी क्षेत्रातील भविष्याचे नायक म्हणजेच ‘फाली’च्या ९ व्या संमेलनाचे आयोजन

May 27, 2023
जैन इरिगेशनचे ३१ मार्च २०२३ ला संपणाऱ्या वर्षाचे एकल आणि एकत्रित आर्थिक निकाल जाहीर
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनचे ३१ मार्च २०२३ ला संपणाऱ्या वर्षाचे एकल आणि एकत्रित आर्थिक निकाल जाहीर

May 27, 2023
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

कॉपी करू नका.