• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अंनिस लोकशाही समृद्ध करण्याचे काम करते.. – विनायक सावळे, अंनिस

कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 10, 2022
in जळगाव जिल्हा
0
अंनिस लोकशाही समृद्ध करण्याचे काम करते.. – विनायक सावळे, अंनिस

भडगाव, दि. १० – अंनिस लोकशाही बळकट करण्याचे काम करते. संघटना, कार्यकर्ता, पैसा, वेळ, विचार, त्याग आणि नेतृत्व या जोरावर चालते. कोणतीही संघटना ही ध्येयवादी माणसे चालवू शकतात. त्यासाठी कार्यकर्ते स्वतः राबतात. ध्येयवादाने प्रेरित होऊन सातत्याने क्रियाशील असलेल्या कार्यकर्त्यांच्या बळावर संघटना चालते, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे (शहादा) यांनी केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे भडगाव शाखेच्या सहकार्याने कार्यकर्ता प्रशिक्षण संवाद शिबीर शहरातील बालविकास विद्यालय येथे घेण्यात आले. प्रथम अभिवादन गीताने सुरुवात झाली. शिबिराचे उद्घाटन बालविकास विद्यामंदिर संस्थेचे चेअरमन विजय महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. समाजातील असलेल्या अंधश्रद्धांच्या अनेक गैरसमज असलेल्या गाठी आहेत. अशीच एक गाठ दोरीला मारली होती. ती गाठ वैज्ञानिक दृष्टिकोनाने सुटते.षती गाठ गायब झाली, अशा अभिनव पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.

यावेळी प्रस्तावनामध्ये शिबिर घेण्यामागचा उद्देश दीपक मराठे यांनी स्पष्ट केला. सूत्रसंचालन व आभार प्रा. डॉ. अविनाश भंगाळे यांनी केले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र चौधरी यांचेसह भडगाव, चाळीसगाव, पाचोरा, खडकी या शाखांचे ३३ कार्यकर्ते उपस्थित होते. शिबिर यशस्वीतेसाठी योगेश शिंपी, प्रा. एल.जी.कांबळे, नेहा मालपुरे, प्रा. दिनेश तांदळे, फिरोज पिंजारी आदींनी परिश्रम घेतले.

▪️अंनिसने समाज शोषणमुक्त करण्याचे काम केले..
शिबिरात पहिल्या सत्रामध्ये “संघटना बांधणी” याविषयी राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी संघटना कशी चालते याविषयी विस्तृत माहिती दिली. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम आता विवेकवादापर्यंत येऊन ठेवले आहे. समाज नास्तिक करणे हे समितीचे गेल्या ३३ वर्षात कधीच ध्येय नव्हते. त्याबाबत सातत्याने गैरसमज पसरवण्यात आला आहे. विवेकपूर्ण व्यवहार करणारा समाज निर्माण करणे हे व्यापक स्वरूपाचे ध्येय समितीचे कायम राहिले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

▪️अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पंचसूत्र..
तिसऱ्या सत्रात विनायक सावळे यांनी ‘समितीची पंचसूत्री’ याविषयी माहिती दिली. शोषण करणाऱ्या, फसवणूक व दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे, समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार व अंगीकार करणे, धर्माची विधायक व कालसुसंगत चिकित्सा करणे, संत व समाजसुधारकांचा वारसा आणि संविधानाचा मूल्य आशय कृतीशील करणे, व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी जोडून घेणे अशी पंचसूत्री असल्याची माहिती विनायक सावळे यांनी यावेळी दिली. तसेच संघटनेत कसे सहभागी व्हावे, शाखांची रचना कशी असते याबाबत देखील त्यांनी या सत्रात सविस्तर माहिती दिली.


Next Post
विट्ठल रुक्मिणी मंदिरात मान्यवरांच्या हस्ते पूजा संपन्न

विट्ठल रुक्मिणी मंदिरात मान्यवरांच्या हस्ते पूजा संपन्न

ताज्या बातम्या

२१ वर्षीय तरुणाची हत्या; दोन संशयित स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर
खान्देश

२१ वर्षीय तरुणाची हत्या; दोन संशयित स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर

August 30, 2025
जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात रोग व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार
कृषी

जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात रोग व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

August 30, 2025
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडिता गर्भवती
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडिता गर्भवती

August 28, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा ‘इको क्लब’ ठरतोय पर्यावरणाचा श्री गणेश!
जळगाव जिल्हा

संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा ‘इको क्लब’ ठरतोय पर्यावरणाचा श्री गणेश!

August 27, 2025
दुर्दैवी अपघात: ओव्हरटेकच्या प्रयत्नात रिक्षाने चिमुकलीचा जीव घेतला
खान्देश

दुर्दैवी अपघात: ओव्हरटेकच्या प्रयत्नात रिक्षाने चिमुकलीचा जीव घेतला

August 27, 2025
जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम : नागरिकांसाठी व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार निवारण सेवा
जळगाव जिल्हा

जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम : नागरिकांसाठी व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार निवारण सेवा

August 26, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group