जळगाव, दि. ०७ – स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार एका मोटर सायकल चोरट्याला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. विकास उर्फ (विक्की) शिवाजी महाले असे संशयित आरोपी चे नाव असून त्याला जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातून अटक करण्यात आली.
चाळीसगांव शहर पोलिस स्टेशन भाग -५ गुन्हा रजिस्टर नंबर १८१/२०२२ भादवि कलम ३७ ९ या गुन्ह्यातील हा आरोपी असून गुन्हा दाखल झाल्या पासुन गायब होता दरम्यान विकास उर्फ (विक्की) शिवाजी महाले हा जळगाव रेल्वे स्टेशन परीसरात आला असल्याची माहीती पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी जावुन सदर आरोपीस ताब्यात घेतले.
त्यास विश्वास घेवून विचारपुस करता त्याने जळगांव, धुळे, मालेगांव, नाशिक परीसरातून चोरी केलेल्या १२ वेगवेगळ्या कंपनीच्या अंदाजे रुपये २,२२,००० /- किमतीच्या मोटरसायकल मिळून आल्याने त्या तपासकामी जप्ती पंचनामा करून करण्यात आला. पुढील तपासकामी चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून आरोपीता कडुन आजुन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्याता असल्याचे सांगण्यात आले.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उप निरीक्षक अमोल देवढे , पोलिस हवालदार विजयसिंग पाटील, अनिल देशमुख, सुधाकर अंभोरे, राहुल पाटील, किरण चौधरी, प्रितम पाटील, प्रमोद लाडवंजारी, ईश्वर पाटील व चालक प्रमोद ठाकुर आदींच्या पथकाने केली.