जळगाव, दि. २८ – स्टार्टअप या शब्दाने गेल्या दशकभरात विशेषत: तरुणाईला भुरळ घातली आहे. स्टार्टअप म्हणजे उद्योगाच्या किंवा उद्योजकाच्या आयुष्यातील प्रारंभीक अवस्था जिचा प्रवास कल्पनेकडुन उद्योगसंरचना संलग्न अर्थव्यवहारापर्यंत होतो. त्याच अनुषंगाने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक विभागातील विद्यार्थी चेतन शिंदे याने स्टार्टअप सुरु केले आहे.
त्यामध्ये चेतनने हॉटेलसाठी मॅनेजमेंटची वेबसाईट आणि वेब एप्लीकेशन तयार केले. त्यामध्ये होम, अबाऊट अस, रुम, बजेट गॅलरी, सर्वीस, प्लेस टू व्हीजीट आणि कॉन्टॅक्ट अस अश्या प्रकारचे विविध वेबपेजस तयार करुन संपुर्ण वेबसाईट तयार केली आहे. यासाठी त्याने वेगवेगळ्या प्रकारचे टुल्स आणि टेकनीक्स यांचा वापर केला आहे. तसेच चेतनला वेब डेव्हलपमेंट या फिल्ड मध्ये वेब डिझाइनिंग, बिल्डींग आणि वेबसाईट मेन्टेन करणे अशा प्रकारचा अनुभव आहे.
या स्टार्टअप मध्ये चेतन शिंदे याला संगणक विभागाचे प्रमुख प्रा. प्रमोद गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार, अधिष्ठाता प्रा. हेमंत इंगळे, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफीसर डॉ. विजयकुमार वानखेडे, संगणक विभागाचे इतर प्राध्यापक वर्ग, प्रा. निलेश चौधरी, प्रा. निलेश वाणी, प्रा. माधुरी झंवर, प्रा. भावना झांबरे, प्रा. जयश्री पाटील, प्रा. प्रशांत शिंपी, प्रा. पुनम पाटील यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन कौतुक केले.