जळगाव, दि. ०९ – जागतिक आरोग्य संघटनेने ५ मे २०२२ रोजी एक अहवाल सादर केला. त्यात भारतामध्ये कोरोनाच्या काळात दोन वर्षांमध्ये ४७ लाख २९ हजार ५९८ इतके व्यक्ती कोरोना काळामध्ये मृत पावले.
परंतु भारत सरकारने ‘खोटे बोला पण रेटून बोला’ या मोदी सरकारच्या पॉलिसीच्या अंतर्गत भारतामध्ये दोन वर्षाच्या काळात केवळ ५ लाख ४७ हजार ७५१ व्यक्ती मृत पावले असा खोटा आकडा समोर ठेवलेला असल्याचा आरोप युवक काँग्रेसच्या माध्यमातून पत्रकार परिषद करण्यात आला.
त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत मोदी सरकारने द्यावी, अशी मागणी जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केली आहे.
VIDEO