जळगाव, दि.०५ – मेहरूण येथील समस्त लाड वंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थेच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांच्या विशेष सत्कार समारंभाचे आयोजन जळगावात दि.०७ मे रोजी करण्यात आले आहे. ना. धनंजय मुंढे यांचा वेळ घेतला असून दौरा निश्चित झाला असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
त्याच बरोबर स्व.गोपीनाथ मुंढे साहेब चौकात प्रवेशद्वाराचे भूमिपूजन देखील करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी समाज बांधवांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पन्नालाल लाडवंजारी यांनी केले आहे.