गजानन पाटील | अमळनेर, दि. ०५ – महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंढे हे शनिवार दि. ७ मे रोजी अमळनेर दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचा उदघाटन सोहळा पार पडणार आहे. यानंतर ना. मुंढे यांच्या उपस्थितीत अमळनेर मतदारसंघातील इंधवे तालुका पारोळा येथे सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संवाद मेळावा होणार आहे.
दरम्यान सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाचे निर्माण अमळनेरातील सिद्धीविनायक कॉलनीत झाले आहे. सदर उदघाटन सोहळ्याप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी खा. ईश्वर जैन, माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, माजी मंत्री तथा जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ.सतीश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक, राष्ट्रवादिचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील, माजी खा. वसंतराव मोरे अधिक मान्यवरांसह आजी-माजी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
तरी उदघाटन सोहळा व संवाद मेळाव्यास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, विधानसभा क्षेत्रप्रमुख भागवत पाटील,पारोळा प स च्या माजी सभापती छायाबाई जितेंद्र पाटील, माजी सभापती प्रकाश जाधव, जि प सदस्य हिंमत वामन पाटील, अशोक नगराज पाटील,चंद्रकांत दामोदर पाटील, एल. टी. पाटील, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील, विनोद कदम, महिला तालुकाध्यक्ष मंदाकिनी पाटील, महिला शहराध्यक्ष अलका पवार, अमळनेर प स सदस्य प्रविण वसंतराव पाटील, निवृत्ती पुंजू बागुल, विनोद जाधव, युवक तालुकाध्यक्ष विनोद सोनवणे, युवक शहराध्यक्ष निलेश देशमुख, राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटील, शहराध्यक्ष सुनिल शिंपी यांनी केले आहे.
कार्यालय देणार राष्ट्रवादीला बळकटी..
विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश त्यानंतर जिल्हा प.परिषद व पंचायत समिती निवडणूकित झालेली पक्षाची सरशी त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश आणि पक्षाचा वाढलेला विस्तार व आता आमदार अनिल पाटील यांच्याच प्रयत्नाने निर्माण झालेले राष्ट्रवादीचे भव्य असे कार्यालय यामुळे अमळनेर मतदारसंघात निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी मिळणार असून सदर कार्यालयामुळे कार्यकर्ते आणि जनतेचा पक्षाशी आणि आमदारांशी संपर्क अधिक वाढणार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.