जळगाव, दि.१२ – भरारी फाऊंडेशनतर्फे बहीणाबाई महोत्सवाचे आयोजन जळगातील सागरपार्क मैदानावर करण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचीत्य साधुन दि.१८ ते २४ एप्रिल दरम्यान सात दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन या महोत्सवात करण्यात आले असून महिला बचत गटांचा महत्वपुर्ण सहभाग असणार आहे. महिला बचत गटांच्या वस्तुंना हक्काच व्यासपीठासह मिळाव त्यांची आर्थिक उन्नती व विकास व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी आणि विनोद ढगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महिला बचत गटांचा वाढता प्रतिसाद पाहता या महोत्सवात जळगांवसह खान्देशातील २०० महिला बचत गट खान्देशा बाहेरील नामवंत अशी ३० महिला बचत गट अशी २३० बचत गटांना नाममात्र दरात या महोत्सवात स्टॉल उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी..
प्रामुख्यान खान्देशातील लोककला व लोककलावंतांच्या जतन व संवर्धनाच्या प्रक्रियेत बहीणाबाई महोत्सव आयोजनाचा मुख्य उद्देश असून खान्देशातील विविध लोककला शाहीरी, भारूड, लग्नगीते, वहीगायन आदी लोककलांबरोबरच शालेय व महाविद्यालयीन युवा कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी बहीणाबाई महोत्सवाचा सांस्कृतिक मंच खुला ठेवण्यात आला आहे. खान्देशातील लोककलेसोबतच महाराष्ट्रातील नामवंत अशी लोककलावंतांना यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
बहीणाबाई खादय महोत्सव..
बहीणाबाई महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे बहीणाबाई खादय महोत्सव बचत गटाने तयार केलेल्या विविध खादय पदार्थाना जळगांवातील नागरीकांची विशेष मागणी असते भरीत भाकरी, शेवभाजी, खापरावरची पुरणपोळी सह खान्देशातील विविध खादय पदार्थांचा या महोत्सवाच्या निमित्तान जळगांवकर नागरीक आस्वाद घ्यायला मिळणार आहे.
बहीणाबाई पुरस्कार व बहीणाबाई विशेष सन्मान.. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व महिला विकासाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी बहीणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात येते खान्देशासह राज्यभरात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या दहा व्यक्तींना बहीणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दरम्यान नागरिकांनी या महोत्सवास भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
VIDEO