• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राष्ट्रीय बुध्दिबळ सांघिक अजिक्यपद स्पर्धा यंदा जळगावात VIDEO

आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा राहणार सहभाग

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 6, 2022
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
राष्ट्रीय बुध्दिबळ सांघिक अजिक्यपद स्पर्धा यंदा जळगावात VIDEO

जळगाव दि.०६ – अखिल भारतीय बुद्धिवळ महासंघ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्टर्स अॅकडमीच्या वतीने दि. ८ ते १३ एप्रिल दरम्यान राष्ट्रीय बुद्धिबळ सांधिक अजिक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पुरुष व महिला गट अशी स्वतंत्रपणे असणार आहे. अशा दिग्गज खेळाडूचे डाव अनुभवायची संधी या निमित्ताने जळगावातील प्रेसिडेंट कॉटेज येथे महाराष्ट्रातील तमाम बुद्धिबळ प्रेमीना मिळणार आहे. अशी माहिती कांताई सभगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आले. यावेळी संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, जिल्हा संघटनेचे सहसचिव शकील देशपांडे, जैन स्पोर्ट्स अकॅडमी समन्वयक अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी प्रवीण ठाकरे, जैन इरिगेशन सिस्टीमच्या मीडिया विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी उपस्थित होते.

जळगावातील या बुध्दिबळ स्पर्धेचे प्रायोजकत्व जैन इरिगेशन सिस्टीमचे अध्यक्ष अशोक जैन यांनी स्विकारले आहे. या स्पर्धेचा डामडौल काही अनोखाच असतो. भारत भरातील नावाजलेले दहा पुरुष व महिला ग्रैंडमास्टर, आंतरराष्ट्रीय मास्टर व फिडे मास्टर, राज्य संघटनेच्या मार्फत चार अधिक एक राखीव अशा पद्धतीने सघ या स्पर्धेसाठी राज्याचे संघ पाठविले जातात . या प्रत्येक संघासोबत त्यांचा संघ व्यवस्थापक देखील स्पर्धेतील पूर्ण कालावधी दरम्यान राहत असल्याने स्पर्धेतील संघाबाबताचे असंख्य बारकावे ते आयोजकांसमवेत हाताळत असतात.

पुरुष गटामध्ये एलआयसी ऑफ इंडिया, ऑल इंडिया रिझर्व्ह बैंक स्पोर्ट्स, सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड आरएसपीबी टीम, तामिळनाडू संघ, आंध्र संघ, बिहार, केरळ, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आदी संघांनी सहभाग निश्चित केला आहे. तर महिला गटामध्ये आंध्र, गुजरात, ओडिसा, बिहार, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आदी राज्य संघ तर पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाचा संघ देखील स्पर्धेत सहभागी असेल.

स्पर्धा सांघिक स्विस पद्धतीने खेळविली जाणार असून लँडमास्टर विसाख दीपण चक्रवर्ती, स्वप्नील घोपाढे, तेजकुमार, आर आर लक्ष्मण, विप्रेश, श्याम निखिल, अर्ध्यादिप दास, सीआरजी कृष्णा, सायंतन दास, दिनेश शर्मा पुरुष महिला पँडमास्टर स्वाती घाटे, किरण मनीषा मोहती, मेरी गोम्स, दिव्या देशमुख, आंतरराष्ट्रीय श्रीराम झा, आंतरराष्ट्रीय मास्टर गटात तर महिला गटात, महिला आंतरराष्ट्रीय मास्टर प्रणाली धारिया साक्षी, मास्टर सौम्या स्वामिनाथन पद्मिनी राऊत, ईशा करवडे, निशा मोहोता, चीतलांगे, तेजस्विनी सागर आदी खेळाडू सहभागी आहेत.

राष्ट्रीय दर्जाची स्पर्धा जळगावमध्ये आयोजीत होत असल्याने जळगावसह महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. स्पर्धेतील प्रत्येक डावाचा कालावधी १० मिनिटे व प्रत्येक चालीसाठी ३० सेकंद वाढीव वेळ राहणार आहे. तब्बल १० लाखाची बक्षिसांची रक्कम विजेत्या संघांना प्राप्त होणार असुन पुरुष व महिला गटात समसमान अशी ५ लाखांची रोख बक्षिसे वितरीत केली जातील. या व्यतिरिक्त स्पर्धेअंती प्रत्येक पटावरील सर्वात जास्त गुण कमावणाऱ्या पहिल्या तीन विजेत्यांना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके देऊन गौरविण्यात येणार आहे.

भारत भरातील बुद्धिबळ प्रेमीच्या खास आग्रहास्तव स्पर्धेतील प्रमुख पट लाईव्ह करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला असून त्या द्वारे घरबसल्या कुठल्याही राज्यातून हे पटावरील महायुद्ध बुद्धिबळ प्रेमीना अनुभवास येणार आहे. या अशा अधिकृत स्पर्धेतील तालिक बाजू देखील अतिशय भक्कम असणे गरजेचे असते. त्याची जबाबदारी आखिल बुद्धिबळ महासंघ आर्विटर कमिशनचे प्रमुख धर्मेंद्र कुमार यांनी मुख्य पंच म्हणून स्वीकारलेली आहे. स्पर्धा आयोजन समितीचे चेअरमन अशोक जैन, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन व सचिव नंदलाल गादिया यांच्या मार्गदर्शनाखाली जैन स्पोर्टस कडमीचे समन्वयक अरविद देशपांडे, रविद्र धर्माधिकारी, प्रविण ठाकरे, विवेक आळवणी व जिल्हा बुध्दीबळ संघटनेचे सदस्य यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजीत केली आहे.

VIDEO

https://youtu.be/hPxwnSOW7dY

 


Next Post
गावठी पिस्तुल बाळगणारा पोलिसांच्या जाळ्यात

गावठी पिस्तुल बाळगणारा पोलिसांच्या जाळ्यात

ताज्या बातम्या

अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; ३ महिला ताब्यात!
खान्देश

अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; ३ महिला ताब्यात!

October 25, 2025
जळगावच्या निकिता पवारची राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड! रत्नागिरीत सुवर्णपदक पटकावले
क्रिडा

जळगावच्या निकिता पवारची राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड! रत्नागिरीत सुवर्णपदक पटकावले

October 25, 2025
पालवी जैनच्या ‘स्वदेशी खरेदी करा’ आर्ट वर्कला प्रथम पुरस्कार!
खान्देश

पालवी जैनच्या ‘स्वदेशी खरेदी करा’ आर्ट वर्कला प्रथम पुरस्कार!

October 25, 2025
बेकायदेशीर पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह आरोपी गजाआड
खान्देश

बेकायदेशीर पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह आरोपी गजाआड

October 24, 2025
“पाडवा पहाट” नाट्यसंगीत-अभंग वाणीने रसिक मंत्रमुग्ध
खान्देश

“पाडवा पहाट” नाट्यसंगीत-अभंग वाणीने रसिक मंत्रमुग्ध

October 23, 2025
आठ वर्षांनंतर आरोपीला अटक, अंदाजे १२ लाखांचे सोने केले हस्तगत
खान्देश

आठ वर्षांनंतर आरोपीला अटक, अंदाजे १२ लाखांचे सोने केले हस्तगत

October 23, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group