फराज अहमद | जामनेर, दि.२९ – श्री गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार व सन्मान सोमवारी नगर परिषदेच्या सभागृहात करण्यात आला. ट्रस्टच्यावतीने दरवर्षी नवनवीन समाजाभिमुख उपक्रम राबविले जातात
जामनेर शहरातील महिला पत्रकार, नगर परिषदेतील महिला कर्मचारी, नगरपरिषदेच्या महिला सफाई कर्मचारी यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर ट्रस्टतर्फे सर्व महिला भगिनींना साडी भेट देण्यात आली. यावेळी सन्मानित महिला भगिनींनी आनंद व्यक्त केला.
आज आमच्या आया-बहिणींना मुलांना चांगले संस्कार देण्याची गरज आहे. मुले संस्कारहीन होताना दिसत आहे. ती संस्कार हीनता आपल्या भारतीय संस्कृतीला अशोभनीय व मारक ठरत ठरेल, ‘जब तक संस्कृती हैं तब तक आस है, बिना संस्कृती मनुष्य का विनाश आहे.’ असे मत श्री गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टचे गादीपती श्याम चैतन्य महाराज यांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.
श्री गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी नवनवीन समाजाभिमुख उपक्रम राबविले जातात. दरम्यान कार्यक्रमाला तहसीलदार अरुण शेवाळे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. भोसले यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीना शिंदे तर सूत्रसंचालन संजय पवार, आभार प्रविण राजनकार यांनी मानले.