• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे व्हॉलींटीयरांना संधी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 24, 2022
in जळगाव जिल्हा
0
गांधीतीर्थतर्फे नववर्ष स्वागतार्थ पीसवॉकचे आयोजन

जळगाव दि.२४ – महात्मा गांधीजींच्या सत्य, अहिंसा,  शांततापूर्ण सहजीवन आणि सहकारातून चैतन्य यासह विविध विषयांद्वारे गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे गांधी विचाराचा प्रचार-प्रसार केला जात आहे. स्वातंत्र्य संग्रामासह महात्मा गांधीजींच्या जीवनावर आधारित गांधी तीर्थ येथील खोज गांधीजी की हे जागतिक दर्जाचे म्युझियम आहे. या ठिकाणी अनेक अभ्यासक आणि पर्यटकांनी भेट दिली असून गांधी विचार पोहचविण्याचे कार्य सुरूच आहे.

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे शांती, अहिंसा, न्यायपूर्ण विश्व निर्माण करण्यासाठी संपूर्ण जगातील व्हॉलींटियरांना त्यांना सेवाकार्य करण्याची संधी देत आहे. यातून महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या सेवाभावनेच्या विचारांना चालना मिळेल. सहभागी होण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.

जागतिक पातळीवर शांततामय आणि वास्तवाला धरून बदल घडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आणि शांतता, न्याय, सुबत्ता आणि श्रमप्रतिष्ठा जपून काम करणाऱ्या व्हॉलींटीयरांसाठी ही उत्तम संधी आहे.  समाजसेवेतून परिवर्तन घडविणाऱ्यांचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी गांधी रिसर्च फाऊंडेशन एक संधी देत आहे. या संधीचा लाभ घेतल्यानंतर गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या समाजोपयोगी प्रकल्पांमध्ये सहभागी होता येईल.

यात वाचनालय आणि अभिलेखागार, शैक्षणिक, संशोधन आणि रचनात्मक कार्य यामध्ये  सामाजीक  विकास,  पाणलोट व्यवस्थापन, ग्रामीण आरोग्य कल्याण योजना,  आरोग्य आणि ग्रामीण उद्योजकता यासह विविध क्षेत्रातुन महात्मा गांधीजींना अपेक्षित असणारी ग्रामस्वराज्य ही संकल्पना साकारता येईल. या सामाजिक कार्यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशन जगभरातून स्वयंसेवकांना आमंत्रित करित आहे.

यासाठी https://forms.gle/DWTbLiBy3N8Vvg8Y6 लिंकवर नोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी http://www.gandhifoundation.net या अधिकृत संकेतस्थळावर भेट देता येईल. व्हॉलींटियरांसाठी कालावधी एक ते तीन महिन्यांचा राहिल.

स्वयंसेवकांचे वय 18 ते 70 या दरम्यान असावे.  स्वयंसेकांनी काम पुर्ण केल्यावर त्यांना प्रशिस्तपत्र देण्यात येईल. व्हॉलींटियरांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था गांधी रिसर्च फाऊंडेशन करेल.  विदेशी  व्हॉलींटियरांनी  प्रवास खर्च व व्हिसा अर्ज करण्यासाठीचा खर्च स्वत:  करावयाचा आहे.

Next Post
मराठी प्रतिष्ठान तर्फे बिया संकलन स्पर्धा

मराठी प्रतिष्ठान तर्फे बिया संकलन स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव येथे राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’ला प्रारंभ
जळगाव जिल्हा

जळगाव येथे राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’ला प्रारंभ

February 4, 2023
लाडवंजारी समाज बांधवांची राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी घेतली भेट
जळगाव जिल्हा

लाडवंजारी समाज बांधवांची राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी घेतली भेट

February 4, 2023
कजगाव ग्रामपंचायतीकडून दिव्यांग तरुणींना सायकल वाटप
जळगाव जिल्हा

कजगाव ग्रामपंचायतीकडून दिव्यांग तरुणींना सायकल वाटप

February 3, 2023
शिवसेना (ठाकरे गट) महिला आघाडीची बैठक संपन्न
जळगाव जिल्हा

शिवसेना (ठाकरे गट) महिला आघाडीची बैठक संपन्न

February 2, 2023
कृषिक्षेत्रासाठी अर्थसंकल्पाची सप्तर्षी.. – अशोक जैन अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.
जळगाव जिल्हा

कृषिक्षेत्रासाठी अर्थसंकल्पाची सप्तर्षी.. – अशोक जैन अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

February 1, 2023
मनसेच्या ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
जळगाव जिल्हा

मनसेच्या ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

January 31, 2023
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

कॉपी करू नका.