• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मल्हार हेल्प फेअर-४ मेळाव्याचे सागरपार्कवर आयोजन

यंदाचा वैविध्याने नटलेला हेल्प फेअर-४ ठरेल अधिक रंजक

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 9, 2022
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
मल्हार हेल्प फेअर-४ मेळाव्याचे सागरपार्कवर आयोजन

जळगाव दि. ०९ – लाईफ इज ब्युटीफुल फाउंडेशन आयोजित, मल्हार हेल्प फेअर-४ हा सेवाकार्याचा मेळावा येत्या १२ ते १४ मार्च २०२२ दरम्यान जळगावातील सागर पार्क येथे संपन्न होणार असून, यात यावर्षी नवीन संकल्पनांना समाविष्ट करण्यात आल्या आहेत. स्वयंसेवी संस्थांच्या प्रदर्शनासोबतच यावर्षी शासकीय योजना, रोजगार मेळावा, खान्देशी खाद्य जत्रा, करमणूक आणि हॉबी डूबी डू हा विभाग तसेच विविध क्षेत्रातील सेवादूतांचा सत्कारही या सोहळ्यात करण्यात येणार आहे. अशी माहिती बुधवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी हेल्प फेअर टीमचे भरतदादा अमळकर, प्रकाश चौबे, नंदू अडवाणी, प्रशांत मल्हारा, आनंद मल्हारा आदी उपस्थित होते.

हेल्प फेअर हा असा सोहळा आहे, जिथे विविध सेवाभावी संस्था, गरजवंत व दाते सगळे एकाच ठिकाणी एकत्र येत असतात. सेवाभावी संस्थांचे मनोबल वाढविणे, त्यांच्या कार्याचा गौरव करणे, त्यांना मदतीचा हात देणे यासोबतच समाजाला समाजऋण फेडण्याचे नवनवे मार्ग दाखविणे, विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, दातृत्व जगविणे, तरुण पिढीला सेवाकार्यात करियरच्या नवीन वाटा दाखविणे हि या आयोजनाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. प्रामुख्याने याच हेतूने या सोहळ्याची मांडणी करण्यात आलेली आहे .

राज्यभरातील संस्थांचा समावेश..
स्थानिक लोकांना प्रेरणा मिळण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या सेवाभावी संस्थांना महाराष्ट्रातून हेल्प फेअर – ४ मध्ये आमंत्रित करण्यात आले असून त्यांत प्रामुख्याने मुंबई, पुणे, धुळे, नंदुरबार येथील संस्थांचा समावेश आहे.

शासकीय योजनांची माहिती व लाभ..
या वर्षी माननीय जिल्हाधिकारी श्री अभिजीतजी राऊत यांच्या पुढाकाराने उपयुक्त अशा शासकीय योजनांची माहिती येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे . त्यात सामाजिक, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण व कृषी विषयक योजनांचा समावेश असेल.

रोजगार मेळावा..
एन.टी.टी.एफ.च्या वतीने, भारत सरकारच्या ‘कमवा आणि शिका अभियाना’ अंतर्गत, रविवारी, दुपारी १ ते ४ वाजेदरम्यान मल्हार हेल्प फेअरमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.  आय.टी.आय. आणि इयत्ता बारावी विज्ञान उत्तीर्ण  निवडक विद्यार्थ्यांना टाटा मोटर्स, पुणे येथील प्रतिनिधी तीन वर्षासाठी कंपनीत समाशिष्ट  करतील.

‘हॉबी डूबी डू’ विभाग..
विद्यार्थी मित्रांसाठी या वर्षी हेल्प फेअरमध्ये विविध विषयांवरील देखावे साकारण्यात येत आहेत . या माध्यमातून  अपंग, अंध आणि गरीब -होतकरू मुलांच्या कलांचे सादरीकरण केले जाईल. मुलांतील सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी ‘हॉबी डूबी डू’  या विशेष विभागाचे समायोजन येथे करण्यात आले आहे, ज्यात स्पोर्ट्स , डान्स, आर्ट , म्युझिक यासारख्या छंद वर्गांचे स्टॉल्स लावण्यात येतील.

दोन दिवसीय कार्यशाळा..
दर वर्षाप्रमाणेच  हेल्प फेअरमध्ये सेवा संस्थांच्या मार्गदर्शन आणि उत्थानासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन १३ आणि १४ मार्चला, दुपारी १ ते ५ वाजेदरम्यान हॉटेल कोझी कॉटेजमध्ये करण्यात आले आहे . या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापुवरच्या श्रीमती कांचनताई परूळेकर आणि सर्जना मेडिया, मुंबईचे श्री मिलिंद आरोळकर  यांना विशेष आमंत्रित करण्यात आले आहे.

सेवामहर्षी आणि सेवादूत पुरस्कार वितरण सोहळा..
दर वर्षाप्रमाणेच या सोहळ्यात उत्कृष्ट सेवाभावी संस्थांना पुरस्कृत करून सन्मानित करण्यात येणार आहे.  विविध स्तरांवर, समाजात नि:स्वार्थ भावनेने सेवाव्रत असलेल्या सेवा महर्षींनादेखील सन्मानित करण्यात येणार असून शहरातील ५ स्वच्छता कर्मचाऱ्यांना ‘स्वच्छतादूत’ हा पुरस्कार वितरित केला जाणार आहे. मान्यवरांची व्याख्यानेही दररोज  असतील.

खान्देशी खाद्यपदार्थांची जत्रा..
बचत गटांना उत्पन्न मिळावे आणि प्रदर्शनात आलेल्यांना जत्रेची मजा चाखता यावी, यासाठी हेल्प फेअरमध्ये विविध बचत गटांचे, खान्देशी पदार्थांचे स्टॉल्सही लावले जातील. करमणुकीसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाची  मेजवानी तीनही दिवस असेल.

कुटुंबातील प्रत्येकाला सेवाभावी संस्थांच्या कार्याशी जोडण्याचा प्रयत्न..
प्रत्येक स्टॉलवर आपण त्या संस्थेच्या कार्याशी कसे जुळू शकतो, पैशा शिवायही आपण त्यांना काय देऊ शकतो, याबाबतची माहिती मिळेल. जेणेकरून प्रत्येक नागरिक त्यांचे आवडते कार्य करणाऱ्या संस्थेशी आपल्या परिस्थितीनुसार जुडू शकेल. आणि या योगे एक आनंदाची, समाधानाची अनुभूती मिळवेल. जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनात यावे आणि एका वेगळ्या आनंदाची अनुभूती घ्यावी, असे हेल्प फेअर टीमचे भरतदादा अमळकर, प्रकाश चौबे, गनी मेमन, नंदू अडवाणी, अमर कुकरेजा, चंद्रशेखर नेवे, प्रशांत मल्हारा, आनंद मल्हारा यांच्या वतीने आवाहन करण्यात आले.

Next Post
जिल्हा काँग्रेसतर्फे दोन लाख डिजीटल सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट

जिल्हा काँग्रेसतर्फे दोन लाख डिजीटल सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्रीको रोमन कुस्तीप्रकारात हर्षित झेंडे प्रथम
क्रिडा

ग्रीको रोमन कुस्तीप्रकारात हर्षित झेंडे प्रथम

September 24, 2023
भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य-कला पुरस्कार जाहिर
जळगाव जिल्हा

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य-कला पुरस्कार जाहिर

September 23, 2023
शिवसेना (ठाकरे गट) तर्फे होऊ द्या चर्चा अभियानाची तयारी सुरू
जळगाव जिल्हा

शिवसेना (ठाकरे गट) तर्फे होऊ द्या चर्चा अभियानाची तयारी सुरू

September 19, 2023
जळगाव ओपन बॅडमिंटन  स्पर्धा २०२३ उत्साहात संपन्न
क्रिडा

जळगाव ओपन बॅडमिंटन  स्पर्धा २०२३ उत्साहात संपन्न

September 19, 2023
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालया मध्ये श्रीगणेशाची प्रतिष्ठापना
जळगाव जिल्हा

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालया मध्ये श्रीगणेशाची प्रतिष्ठापना

September 19, 2023
शिंपी समाज हितवर्धक संस्था व अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव जिल्हा

शिंपी समाज हितवर्धक संस्था व अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 17, 2023
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

कॉपी करू नका.