• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जागतिक महिला दिनाची पूर्वसंध्या “ताल सुरनका मेल” या वैशिष्ट्यपूर्ण दशरंगी कार्यक्रमाने रंगली

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 7, 2022
in जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
जागतिक महिला दिनाची पूर्वसंध्या “ताल सुरनका मेल” या वैशिष्ट्यपूर्ण दशरंगी कार्यक्रमाने रंगली

जळगाव दि ०७ – स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्तिक विद्यमाने जागतिक महिला दिनाची पूर्वसंध्या ‘ताल सुरनका मेल’ या दशरंगी कार्यक्रमाने रंगली. शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, अभंग, भजन, गौळण, भावगीते, गझल, फ्युजन यांबरोबरच हार्मोनियम वादनाला जळगावकर रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.

दसक्कर सिस्टर्स प्रेझेंटस् “ताल सुरनका मेल” या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन कांताई सभागृहात सोमवारी झाले. कार्यक्रमाच्या उदघाटनाप्रसंगी ज्योती अशोक जैन, डॉ.अनुराधा अभिजित राऊत, डॉ.अमृता प्रवीण मुंढे, डॉ.शिल्पा किरण बेंडाळे, डाॅ.अपर्णा भट, दीपिका चांदोरकर उपस्थितीत होते. ‘ताल सुरनका मेल’ या मैफिलच्या सुरवातीला प्रथमेश्वरा गणदीश्वरा ने झाली. अश्विनी दसक्कर भार्गवे, ईश्वरी दसक्कर, गौरी दसक्कर, सुरश्री (पूजा) दसक्कर भगिनींनी शास्त्रीय गायनात राग बागेश्री गंधार गुरू नाम जो लागे सुखदायी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. यानंतर झणी दृष्टी लागो हा अभंग सादर केला.

भाग्यदा लक्ष्मी बारम्मा यासह कृष्णपद ‘याचे हातीचा वेणू कुणी घ्या ग’ ही गौळण सादर केली. ‘मोसो चैन नही आवेरी’ हे फ्युजन सादर करुन रसिकांना परमोच्च आनंदाची अनुभूती करून दिली. रागमाला ने मैफिल चांगलीच रंगली. व्होकल हार्मनीच्या आविष्कारात सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, ये राते ये मौसम नदी का किनारा, मेंदीच्या पानावर, पुकारता चला हूं में, जिना इसीका नाम है, पाहिले न मी तुला, राजा सारंगा, ताल सुरन का मेल सादर करून रसिकांची मने जिंकले. हिंदी, मराठी भावगीते, सिनेसंगीतातील लोकप्रिय गीते यांबरोबरच पाश्चिमात्य सिम्फनी जळगावकरांनी अनुभवली. संपूर्ण मैफिलला तबल्यावर साथ संगत कल्याण पांडे यांनी केले.

डाॅ.अनुराधा राऊत व डाॅ.शिल्पा बेंडाळे यांनी मनोगत व्यक्त करीत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते कलावंतांचा सत्कार करण्यात आले. गुरूवंदना श्रुती जोशी यांनी म्हटली. सूत्रसंचालन स्मिता झारे यांनी केले. चांदोरकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर यांनी आभार मानले.


 

Next Post
‘चला जाऊया पाडळसरे धरणावर’ या सामूहिक दौर्‍याचे आ.अनिल पाटीलांनी केले आयोजन

'चला जाऊया पाडळसरे धरणावर' या सामूहिक दौर्‍याचे आ.अनिल पाटीलांनी केले आयोजन

ताज्या बातम्या

टोके शाळेत लिनेस क्लबतर्फे मोफत दंत चिकित्सा शिबिर संपन्न
आरोग्य

टोके शाळेत लिनेस क्लबतर्फे मोफत दंत चिकित्सा शिबिर संपन्न

February 18, 2026
लीनेस क्लब जळगावचा सामाजिक उपक्रम: आवार येथील ‘वाचन कट्ट्या’ला शालेय साहित्याची मदत
जळगाव जिल्हा

लीनेस क्लब जळगावचा सामाजिक उपक्रम: आवार येथील ‘वाचन कट्ट्या’ला शालेय साहित्याची मदत

February 18, 2026
जळगावात शिवजयंतीचा उत्साह; शिवकॉलनीत छत्रपती शिवरायांच्या भव्य प्रतिकृतीचे होणार अनावरण
जळगाव जिल्हा

जळगावात शिवजयंतीचा उत्साह; शिवकॉलनीत छत्रपती शिवरायांच्या भव्य प्रतिकृतीचे होणार अनावरण

February 17, 2026
प्लास्टिक विरोधात जळगाव महापालिकेचा ‘एल्गार’; १ मार्चनंतर थेट २५ हजारांचा दंड अन् फौजदारी गुन्हे!
जळगाव जिल्हा

प्लास्टिक विरोधात जळगाव महापालिकेचा ‘एल्गार’; १ मार्चनंतर थेट २५ हजारांचा दंड अन् फौजदारी गुन्हे!

February 18, 2026
शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे
कृषी

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 17, 2026
जळगाव मनपा स्थायीवर अनुभवाचा ‘कस’; महायुतीचा दबदबा, १६ सदस्यांची निवड!
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा स्थायीवर अनुभवाचा ‘कस’; महायुतीचा दबदबा, १६ सदस्यांची निवड!

February 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group