गजानन पाटील | अमळनेर, दि. ०७ – तालुक्यातील मतदार संघाचे आमदार अनिल पाटील यांनी ‘चला जाऊया पाडळसरे धरणावर’ या सामूहिक दौर्याचे आयोजन सोमवारी केले होते. आमदार पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदार संघातील नागरिकांनी दौऱ्यात सहभाग घेतला.
तालुक्यातील निम्न तापी पाडळसरे प्रकल्प म्हणजे अमळनेर तालुक्यासह परिसरातील शेतकरी आणि जनतेसाठी नवसंजीवनी असून येत्या मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात १० मीटर पर्यंत पिलरच्या कामाचे टार्गेट असल्याचे आमदार पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पाडळसरे प्रकल्पासाठी गेल्या वर्षी १३५ कोटी व चालू आर्थिक बजेट मध्ये देखील भरीव निधीची तरतूद करण्याची मागणी करणार असल्याचे देखील आमदार पाटील बोलत होते.
VIDEO