फराज अहमद | जामनेर, दि.०१ – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ जामनेरात महा विकास आघाडीतर्फे मंगळवारी निषेध आंदोलन करण्यात आले. दरम्यान राज्यपाल यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन शहरातील नगरपालिका चौकात करून जोरदार घोषणा देण्यात आल्या.
भगतसिंग कोश्यारी यांनी अंगाला राख लावत रुद्राक्षाच्या माळा घालून हिमाचल प्रदेशात जावे, व त्या ठिकाणी समाधी घ्यावी. अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे पदाधिकारी संजय गरुड यांनी निषेध व्यक्त केला.
यावेळी प्रदीप गायके, राजू खरे, डॉक्टर प्रशांत पाटील, डॉक्टर बाजीराव पाटील, पप्पू पाटील, संतोष झाल्टे, मोहन चौधरी, मनोज महाले, प्रल्हाद बोरसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
VIDEO