• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भाजपच्या खा.रक्षा खडसे आणि काँग्रेसचे आ.शिरीष चौधरी यांचे शेतकऱ्यांसाठी रास्ता रोको

चिनावल परिसरातील शेतात अज्ञातांकडून चोऱ्या व पिकांची नासधूस

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 28, 2022
in कृषी, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
भाजपच्या खा.रक्षा खडसे आणि काँग्रेसचे आ.शिरीष चौधरी यांचे शेतकऱ्यांसाठी रास्ता रोको

रावेर, दि.२८ – चिनावल परिसरात मागील बऱ्याच दिवसापासून शेतात चोऱ्यांचे तसेच शेत साहित्य व पिकाच्या नुकसानीच्या घटना घडत आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर मागील सात दिवसांपासून परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असल्याने रविवारी संतप्त शेतकर्‍यांनी सावदा येथे रास्ता रोको करून आपला रोष व्यक्त केला.

दरम्यान रास्तारोको आंदोलनास खासदार रक्षा खडसे, महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज आणि आमदार शिरीष चौधरी यांनी सहभाग घेतला शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडतांना अतिशय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा सचिव भरत महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नंदू महाजन, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, बाजार समिती सभापती गोपाळ नेमाडे, भुसावळ शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे, रमाकांत दुबे व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चिनावल शिवारात्त दोन शेतकऱ्यांच्या ठिबक आणि नळ्या जाळून टाकण्यात आल्या तर एका शेतात केळीचे खोडे कापुन जवळजवळ ४ लाखाचे नुकसान करण्यात आले. आपल्या शेतांमधील चोर्‍यांना पोलिसांचे संरक्षण असल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणी कठोर कार्यवाहीची मागणी करण्यात आली.

तसेच चोरी झालेल्या सदर शेतमालाची बिनारोकठोक रेल्वेद्वारे वाहतूक केली जाते, म्हणुन भुसावळ विभागाचे अप्पर डीआरएम रुख्मैय्या मीना यांना आंदोलन स्थळी बोलविण्यात येऊन कठोर कार्यवाही करणे बाबत खासदार रक्षा खडसे यांनी सुचना केल्या. तसेच चिनावल परिसरातील चोरट्यांवर पोलीस विभागमार्फत कारवाई न झाल्यामुळे ते शिरजोर झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व तक्रारींवरून गुन्हे दाखल करावेत, आणि या कामात कुचराई करणार्‍या एपीआय यांची तत्काळ बदली करावी अशी मागणी करण्यात आली.

Next Post
जैन इरिगेशनची फ्युचर फार्मिंग शेतीमधील नवदृष्टी – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

जैन इरिगेशनची फ्युचर फार्मिंग शेतीमधील नवदृष्टी - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

ताज्या बातम्या

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजसुरक्षेबाबत सजग राहा! महावितरणचे महत्त्वाचे आवाहन
जळगाव जिल्हा

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजसुरक्षेबाबत सजग राहा! महावितरणचे महत्त्वाचे आवाहन

September 5, 2025
‘श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत साईबाबा मंदिरात मोफत आरोग्य तपासणी शिबिर
आरोग्य

‘श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत साईबाबा मंदिरात मोफत आरोग्य तपासणी शिबिर

September 4, 2025
श्री रामदेवबाबांच्या दशमी उत्सवाची सांगता, गुरुनानक नगरात भंडाऱ्याचे आयोजन
जळगाव जिल्हा

श्री रामदेवबाबांच्या दशमी उत्सवाची सांगता, गुरुनानक नगरात भंडाऱ्याचे आयोजन

September 3, 2025
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशाची लूट, २ चोरटे जेरबंद
खान्देश

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशाची लूट, २ चोरटे जेरबंद

September 2, 2025
अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात पिस्तूल विक्री करणारे; १.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात पिस्तूल विक्री करणारे; १.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2025
अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न, नंतर मारहाण; प्रियकरासोबत गेल्यावर १० जणांवर गुन्हा
गुन्हे

अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न, नंतर मारहाण; प्रियकरासोबत गेल्यावर १० जणांवर गुन्हा

September 1, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group