• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन इरिगेशनची फ्युचर फार्मिंग शेतीमधील नवदृष्टी – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

राज्यपालांनी जाणून घेतले जैनचे उच्च कृषितंत्रज्ञान

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 28, 2022
in कृषी, जळगाव जिल्हा
0
जैन इरिगेशनची फ्युचर फार्मिंग शेतीमधील नवदृष्टी – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

जळगाव दि.२८ – जैन इरिगेशनच्या माध्यमातून कृषिक्षेत्रात शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य अव्दितिय असेच आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार केला असता कमी जागा, कमी पाण्यात चांगल्या गुणवत्तापूर्ण शेतमालाचे उत्पादन ही काळाची गरज ठरणार असून फ्युचर फार्मिंगमधील शेती नवीदृष्टी ठरू शकते अशी प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फ्युचर फार्मिंग (भविष्यदर्शी शेती) या प्रकल्पाला भेट दिली त्यावेळी दिली. जैन इरिगेशनचे शेतीमधील नवनवीन प्रयोग देशातील अधिकाधिक शेतकरी बांधवांना कळल्यास ते त्यांच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील.

जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी भविष्यातील काळाची पाऊले ओळखून त्या दृष्टीने साकारलेल्या उच्च तंत्रज्ञान, फ्युचर फार्मिंग, माती विरहीत शेती, सॉईललेस मीडिया, व्हर्टिकल फार्मिंग, भाजीपाला,  स्ट्रॉबेरी, पुदिना, खिरे काकड्या, हळद, आले, टोमॅटो,  ब्रोकोली आदी प्रयोगांच्या ठिकाणी राज्यपाल यांनी भेट देऊन मोठ्याउत्सुकतेने माहिती जाणून घेतली. शेतीतील या प्रयोगांमुळे जैन इरिगेशनने जणू कृषि विश्वाची निर्मिती केली आहे.

राज्यपालांनी फ्युचर फार्मिंग लॅबमध्ये एरोपोनिक बटाटा या प्रयोगाची माहिती घेतली. या प्रयोगात भविष्याची अन्नाची वाढती गरज आणि नवतंत्रज्ञान यांचा सुरेख मेळ एरोपोनिक्स बटाटा प्रयोगात आहे. नैसर्गिक संसाधने सिमीत असतील व त्याउलट लोकसंख्या वाढलेली असेल त्या संसाधनांमध्ये अन्न धान्याच्या उत्पादनाला मर्यादा येणार आहे. आपण जमिनी, पाणी व अन्य निसर्गदत्त घटक वाढवू शकत नाही परंतु एरोपोनिक्स बटाटा यासारख्या नवतंत्राचा पुरेपूर उपयोग करून भविष्यात चांगला पर्याय उभा करू शकतो असे राज्यपाल जैनचे उच्च कृषितंत्रज्ञान समजावून घेताना म्हणाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या जैन हिल्स येथील दौऱ्यात कंपनीच्या कॉर्पोरेट प्रोफाईलीची माहिती देणाऱ्या परिश्रम भवनास भेट दिली. यासह जैन हिल्स परिसरातील अत्यंत निसर्गरम्य अशा ‘भाऊंची सृष्टी’ या भाऊंच्या स्मृतिस्थळास भेट दिली. श्रद्धेय भवरलालजी जैन हयात असताना त्यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण स्थळात ते रमले. भाऊंच्या सृष्टी येथे असलेल्या वाटिकेत त्यांच्याहस्ते आंबा रोपेचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन व अतुल जैन तसेच काही निवडक वरिष्ठ सहकारी देखील यावेळी उपस्थित होते. या भेटी दरम्यानच्या प्रवासात त्यांनी विविध फळांच्या लागवड क्षेत्रांचीही पाहणी केली. ज्या परिसरात वॉटर युनिव्हसिटी उभारली जाणार आहे, तो परिसर त्याची संकल्पना समजून घेतली. याबरोबरच जगातील सर्वात मोठ्या टिश्युकल्चर उत्पादन केंद्र म्हणून नावारुपास आलेल्या केळीच्या टिश्युकल्चर लॅब आणि प्रायमरी हार्डनिंग प्रकल्पास भेट दिली. या लॅबमध्ये तयार होणाऱ्या उत्पादनांची निर्मीती व थेट शेतकऱ्यांपर्यंत हे उच्च तंत्रज्ञान कसे पोहोचते याची माहिती त्यांनी जाणून घेतली.

या प्रवासात त्यांनी भविष्यातील शेती (फ्युचर अॅग्रिकल्चर) येथे व्हर्टिकल फार्मिंग, मातीविना शेती, हायड्रोपोनिक्स शेती या सह भविष्यातील शेती याबाबतच्या तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली. या उच्च कृषी जैवतंत्रज्ञानाची ओळख करून घेण्यासाठी त्यांनी बायोटेक्नॉलॉजी लॅबचीही आवर्जून भेट घेतली.  त्याबाबतची माहिती सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन व अतुल जैन, डॉ.अनिल ढाके, डॉ.बी.के. यादव,  डॉ.अनिल पाटील, के.बी.पाटील यांनी करून दिली.


 

Next Post
गांधीतीर्थ हे तर भारतातील पाचवे धाम.. – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

गांधीतीर्थ हे तर भारतातील पाचवे धाम.. - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

ताज्या बातम्या

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट
खान्देश

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

September 12, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 12, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर
कृषी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

September 12, 2026
राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
जळगाव जिल्हा

राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन

September 12, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक

September 12, 2026
१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट
Uncategorized

१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट

September 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add