हेमंत पाटील | जळगाव, दि.२३- राष्ट्रवादीचे नेते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडी मार्फत चौकशी करून आज अटक करण्यात आली. दरम्यान मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी हाताला काळ्या फिती बांधून घोषणा देण्यात आल्या.
राजकीय द्वेषापोटी ही कारवाई करण्यात आली असल्याचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, वाल्मीक पाटील, सलीम पटेल, राजू मोरे, रमेश बहारे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
VIDEO