जळगाव, दि.१७ – रोटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून यंदा जळगावात अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी होणार आहे. यात अष्टप्रधान जुना ऐतिहासिक काळाचा सजीव देखावा उभा करण्याचा प्रयत्न आहे. सरदार, मावळे, पेशवे, अष्ट प्रधान मंडळ हा देखावा सजीव रूपात दाखविणार असून यंदा नाविन्यपूर्ण अशी शिवजयंती क्लबच्या माध्यमातुन साजरी होणार आहे.
जी.एस. ग्राऊंडच्या मागील बाजूने महाराजांची प्रतिकात्मक मूर्ती घेऊन सर्व देखावा पायी चालनार आहे. त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौकात ३२x१२ फुट अशा भव्य बॅनरवर महाराजांचे आयुष्याती काही प्रसंग रेखाटण्यात येणार आहे. संपूर्ण कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजुला असलेल्या भिंतीजवळ साजरा होईल, अशी माहिती क्लबचे सदस्य जयवर्धन नेवे यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. तसेच जळगावकरांनी कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भेट द्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले.
यावेळी शाहीरी पोवाडा व मानवंदना देण्यात येईल. कार्यक्रमासाठी पालकमंत्री गुलाबराव वाटील, महापौर जयश्री महाजन, माजी महापौर विष्णु भंगाळे, माजी महापौर नितीन लढ्ढा यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. शिवशाहीर तसेच शिवचरित्राचे गाढे अभ्यासक दत्तात्रय (दादा) नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम संपन्न होणार आहे.
VIDEO-