जळगाव, दि.१७ – जळगाव मधील युवा उद्योजक पराग घोरपडे यांना एसडीजी क्षेत्रा मध्ये ७९ देशांमध्ये काम करत असलेली आंतरराष्ट्रीय संस्था यूएनएसीसीसी ने ‘महाराष्ट्र राज्याच्या युवा संयोजक पदी’ नियुक्त केले आहे.
त्यांची नियुक्ती ही डॉ. रजत शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली रोहित काळे, अध्यक्ष (युवा परिषद महाराष्ट्र) यांनी केली.
त्यांना ही जबाबदारी त्यांचे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बघून देण्यात आलेली आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ.रजत शर्मा यांनी सांगितले की, यूएनएसीसीसी सध्या ७९ देशांमध्ये एसडीजी ह्या क्षेत्रात काम करत आहेत जे की २०३० पर्यंत एसडीजी अंमलबजावणी करण्याचे संयुक्त राष्ट्राचे ध्येय आहे.
त्यासाठी निती आयोग, यूएनएसीसीसी आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्था यांच्या संयुक्त पुढाकाराने प्रत्येक गावकरी व शहरी नागरिकांना एसडीजीची उद्दीष्टे आणि त्यांचे गौरव, त्यांची भूमिका व एसडीजीच्या प्रगतीविषयीची जबाबदारी आणि कृती, त्यांना एकत्रितपणे भाग घेण्यास व राष्ट्र उभारणीत हातभार लावणे ह्या करीत संपूर्ण देश भरात सामाजिक संस्था सोबत घेऊन गावा गावाचा विकास झाला पाहिजे त्या साठी काम करत आहे.