जळगाव, दि.१२ – शहरातील टेलिफोन नगर येथील रहिवासी आणि ज्येष्ठ साहित्यिक मधुकर नेवे यांचं नुकतंच वृद्धापकाळाने निधन झालं, त्यांचे शुक्रवारी तेरावे होते, स्व.मधुकर नेवे यांनी आपल्या जीवन काळात प्रामाणिक पणाने काम करून नेहमीच समाज सेवेला प्राधान्य दिले होते. त्यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या मुलांनीही त्यांचा हा वारसा जपत, त्यांचे मृत्यू नंतर करण्यात येणारे विधी संस्कार हे अतिशय साधेपणाने घरच्या घरी केले.
विशेष म्हणजे परंपरेच्या जोखडातून बाजूला होत तेराव्याचां कार्यक्रम टाळला, त्या ऐवजी नेवे परिवाराने रक्तदान शिबिराचे आयोजन केले. जळगाव शहरातील रेडक्रॉस येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची विशेष उपस्थिती होती.
नेवे परिवारात एकाच महिन्यात मधुकर नेवे ,नलिनी नेवे यांचा मृत्यू झाल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना रक्तदान करून रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी आपल्या वाड वडिलांच्या आत्म्याला शांती मिळावी. या उद्देशाने सेवाधर्म परिवाराच्या वतीने नेवे परिवाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले.
यावेळी अनेक रक्तदात्यानी रक्तदान करून या उपक्रमाला प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा सत्कार चंद्रशेखर नेवे यांनी केला. तर विजय नेवे, प्रकाश नेवे, विनय नेवे, हरीश नेवे, आर्या फाऊंडेशनचे डॉ.धर्मेंद्र पाटील, डॉ नरेंद्र ठाकूर, कला सिद्दी फाऊंडेशनच्या आरती शिंपी, जिंदगी फाऊंडेशनच्या सुश्मिता भालेराव, अजय पाटील, दिपाली कासार, सुमोल चौधरी, आनंद मलारा, निखिल, सूमोल चौधरी, भावेश पाटील, सतीश पाटील, सोहम मोरे, संघपाल तायडे, अमोल सोनार, शुभम चव्हाण आदींसह अनेकांनी रक्तदान केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उजवला वर्मा, डॉ.अपर्णा मकासरे, विनोद बियाणी, आरोही नेवे यांनी सहकार्य केले.
वडीलांच्या तेराव्याच्या निमित्ताने नेवे परिवाराने रक्तदान शिबिराचे आयोजन करणे, हे समाजासाठी एक आदर्श आणि प्रेरणा घालून देणारे उदाहरण असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. तर रक्तदान केल्याने त्यात कोणाचे तरी प्राण वाचणार आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने वडिलांना श्रद्धांजली मिळेल म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याचं मत नेवे परिवाराच्या वतीने विनय नेवे यांनी व्यक्त केले.