• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अस्थिरोग तज्ञांद्वारे अ‍ॅसिटाबुलम फ्रॅक्‍चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 10, 2022
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
अस्थिरोग तज्ञांद्वारे अ‍ॅसिटाबुलम फ्रॅक्‍चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव, दि. १० – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात एका ४२ वर्षीय पुरुष रुग्णाला खुब्याच्या वाटीच्या हाडाच्या फ्रॅक्‍चरवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी रित्या करण्यात आली. हा रुग्ण अनेक खाजगी हॉस्पीटल मध्ये गेला मात्र त्याला कुठेच दाखल करुन घेण्यात आले नाही, मात्र डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात त्याला तात्काळ दाखल करुन घेतले. त्याच्या अपघाताची माहिती तज्ञांनी जाणून घेतली आणि सीटी स्कॅन करण्यास सांगितले. यात त्याला खुब्याच्या वाटीच्या हाडाला गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले.

पहिल्या टप्प्यात ट्रॅक्शनची मदत..
अस्थिरोग तज्ञ डॉ.प्रमोद सर्कलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सुनित वेलणकर, इंटर्न डॉक्टर्स यांनी रुग्णाच्या पायाला वजन बांधले. यामुळे रुग्णाच्या वेदना कमी झाल्या आणि फ्रॅक्‍चर झालेले हाड मुळजागी बसण्यास मदत झाली. सात ते आठ दिवस ही उपचार पद्धती अवलंबली.

स्क्रू, प्लेट्सच्या सहाय्याने फिक्सेशन..
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत अ‍ॅसिटाबुलम फ्रॅक्‍चरवरची शस्त्रक्रिया अस्थिरोग तज्ञ डॉ.प्रमोद सर्कलवाड यांनी केली असून त्यांना रेसिडेंट डॉ.सुनित वेलणकर, डॉ.राहूल जनबंधू, भुलरोग तज्ञ डॉ.देवेंद्र चौधरी यांचे सहकार्य लाभले. स्क्रू आणि प्लेट्सच्या सहाय्याने फिक्सेशन करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर तीन ते चार दिवसांनी रुग्ण पायाची हालचाल करु शकला.

कठीण, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया शक्य..
अ‍ॅसिटाबुलम फ्रॅक्‍चरसह अन्य कठीण व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेंसाठी मेट्रो सिटीत जाण्याची गरज आता राहीली नाही. कारण या शस्त्रक्रिया आपल्या येथे करणेही शक्य आहे आणि त्या देखील योजनेंतर्गत मोफत केल्या जातात, याचा रुग्णांनी लाभ घ्यावा.
– डॉ.प्रमोद सर्कलवाड, अस्थिरोग तज्ञ


 

Tags: गोदावरी फाऊंडेशनजळगावडाॅ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय
Next Post
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे ‘कान्हदेशातील गांधी’ वेबिनार

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे 'कान्हदेशातील गांधी’ वेबिनार

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add