जळगाव, दि. ०६ – गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शनिवार, ५ फेब्रुवारीला वसंत पंचमी साजरी करण्यात आली. स्कूलच्या प्राचार्या नीलिमा चौधरी यांनी सरस्वती प्रतिमा पूजन, विद्येचे साहित्य, संगीत वाद्ययंत्राचे पूजन केले. तसेच वसंत पंचमीचे महत्व सांगितले.
या दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. वसंताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. वसंत म्हणजे आशा व सिद्धी यांचा सुंदर मिलाफ असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगून वसंत पंचमीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी सरस्वती वंदन, श्लोक सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.
डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ येथे वसंत पंचमी साजरी
जळगाव – वसंत पंचमी हा सण दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा दिवस देवी सरस्वतीला समर्पित आहे. हा सण माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला साजरा केला जातो. त्यानिमित्त डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका अनघा पाटील यांनी सरस्वतीला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. याप्रसंगी उपस्थीतांनी सरस्वतीची प्रार्थना केली.