जळगाव,दि. ०३ – गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात इंटलेक्चुअल पापर्टी राईट अॅण्ड रिलेटेड पोसीजर अर्थातच बौद्धीक संपदा हक्क व विविध पद्धती या विषयावर यशस्वी संवादाचे आयोजन करण्यात आले. गोदावरी फाऊंडेशनचे गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये इन्स्टीट्यशनस इनोवेशन काऊंसील व इंडियन पेटंट ऑफीस, मंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, इंटलेक्चाल पापी राईट व रिलेटेड पोसीजर या विषयावर ऑनलाईन संवादाप्रसंगी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
डॉ.विजयकुमार यांनी महाविद्यालयाने इनोव्हेशन संदर्भात कार्यान्वित केलेल्या विविध कार्याची माहिती दिली. आय पी आरचे महत्व लक्षात आणुन देत ते म्हणाले की, आय पी आर हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असतो. आणि भविष्यातील संशोधन क्षेत्राचा विकास व नोकरीच्या संधी, आरोग्य व साक्षरता यासाठीही महत्त्वाचा असतो. स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजार हा हैकर्स तसेच पायरसी पासुन बचाव करण्याचे काम आयपीआर करत असते.
कार्यक्रमादरम्यान विषय तज्ञ प्रतिक हेदे पेटंट अॅण्ड डिझाईन परिक्षक इंडियन पेटंट ऑफीस मुंबई यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभले. त्यांनी पेंटट, कॉपीराईट, ट्रेडमार्क, टेडसिकेट अशा विविध बौद्धीक संपदा हक्काच्या विषयावर सखोल विवेचन केले. पेटंट फाईल करतांना कोणत्या पद्धती आहेत. व त्या अनुषंगाने येणार्या अडचणी व उपाय याचे विश्लेषण केले. कॉपीराईट हा एखादे संशोधन किंवा संशोधन लेख हा त्या संशोधकाचा अधिकार असतो. एखाद्या वस्तुची नवनिर्मिती ही कॉपी राईटमुळे सरक्षीत होते. उदा. कला, नाटक, संगीत, कथा, तंत्रज्ञान इत्यादी.
ट्रेडसिट म्हणजे एखाद्या कंपनीची एखादे उत्पादन बनवण्याची पद्धत ही बाह्य जगतास माहित होत नाही. ते संपूर्ण कंपनीच्या संशोधन आणि विकास ह्या विभागाच्या अधिपत्याखाली असते. इंडस्ट्रियल डिजाईन हे एखाद्या उत्पादनाचा एकमेव आकार, रचना दर्शविते. ट्रेडमार्क हे एखाद्या उत्पादनाचा ब्रॅन्ड नाव, स्लोगन किंवा लोगो दर्शविते. या ब्रँडवरच ते उत्पादन बाजारात ओळखले जाते. एखाद्याचे मान्य झालेले पेंटट हे साधारणतः २० वर्ष ग्राह्य असते. इंडस्ट्रियल डिजाईन हे १० ते १५ वर्ष, ट्रेडमार्क हे १० वर्ष तसेच नुतनीकरण ही करता येते. तसेच भौगोलीक वैशिष्ट्य हे १० वर्षे आणि कॉपी राईट हे त्याच्या लेखकाच्या हयाती पर्यत अधिक ६ वर्षे ग्राह्य धरले जाते.
शेवटी सहभागार्थीनी विचारलेल्या प्रश्नास अतिशय समाधानकारक उत्तरे देत प्रतिक यांनी कार्यक्रमाच्या उद्देशाची परिपुर्णता केली. कार्यक्रमास राज्यातील विविध शास्त्र तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच प्राध्यापक उपस्थित होते. उद्योग जगतातील सहभागार्थींचीही विशेष उपस्थित होती. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. विजयकुमार अध्यक्ष (आयआयसी) तसेच प्रा. हेमंत इंगळे उपाध्यक्ष (आयआयसी) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तर प्रा.योगेश वंजारी, समन्वयक प्रा. विजय चौधरी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला.