• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 3, 2022
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

जामनेर, दि.०३ – येथील ऋषिकेश नर्सरी भागात सायंकाळच्या सुमारास एका अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना बुधवारी घडलीये. दरम्यान जामनेर कडून बोदवडकडे जाणाऱ्या मार्गावर शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर ही घटना घडली असून अज्ञात वाहन चालक फरार झाला आहे.

या घटनेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. जामनेर ते बोदवड मार्ग या राखीव वनक्षेत्राच्या अगदी लगत आहे. काही प्रत्यक्षदर्शींनी या घटनेची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिल. माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी अमोल पंडित यांच्या सूचनेवरून वनरक्षक ठोंबरे, पी एस भारुडे, प्रशांत पाटील, वनपाल सुनील पाटील, प्यारेलाल महाजन, विकास गायकवाड आदींसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला.

या पथकाने बिबट्याचा मृतदेह वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात आणून तेथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या मृतदेहाचे निरीक्षण केले. दरम्यान पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत व्यवहारे शवविच्छेदन करणार असून त्यानंतर मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत .

बिबट्यांसह या जंगलातील वन्यपशुंना मुक्तसंचार करता यावा, त्यांचा नैसर्गिक अधिवास माणसांकडून किंवा अन्य कोणत्याही कारणांनी बाधित होऊ नये म्हणून, यापुढे उपाययोजना केल्या जाव्यात अशी मागणी वन्यजीव प्रेमींकडून केली जात आहे.

Next Post
गोदावरी अभियांत्रिकीत बौद्धीत संपदा हक्‍कावर संवाद

गोदावरी अभियांत्रिकीत बौद्धीत संपदा हक्‍कावर संवाद

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता

September 10, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add