जामनेर, दि. 30 – राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टिपु सुलतान संदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ रविवारी जामनेर शहरात महा विकास आघाडी च्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. दरम्यान फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध करत जोरदार घोषणा दिल्या.
यावेळी मदन जाधव, किशोर पाटील, विलास राजपूत, डाॅक्टर प्रशांत पाटील, अनिस पैलवान, शाहिद शेख, राजू शेख, अश्फाक पटेल, सुधाकर सराफ, भारत पवार आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.