जळगाव, दि. २८ – निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान तर्फे शहरातील निराधार व अनाथांसाठी फुड बँक चालविले जाते, त्याच बरोबर वस्ती भागातील गरजु व होतकरु विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग चालविले जातात. दरम्यान निःस्वार्थ वर्गाच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ.केदार थेपडे, सुषमा थेपडे होते. तर प्रमुख अतिथि म्हणून पोलिस उपनिरीक्षक राजू मोरे, लोककलावंत विनोद ढगे, भरारी फॉउंडेशनचे दिपक परदेशी, उद्योजक कांचन साने, प्रल्हाद जावळे, माजी क्रीडा अधिकारी किरण जावळे आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख मान्यवरांचे हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करत सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरु झाली. आरती पाटील व नैतिक वैष्णव यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगितले. तसेच कृष्णा सोनार (वय ८) या विद्यार्थ्याने अंक १ पासुन ते १०० पर्यंत अंकाचे वर्ग (squares) चे उत्तर दिले. सिद्धि घेंगट (वय ७) या हिने सामान्य ज्ञानाची सखोल माहिती इंग्रजीतून दिली. विशेष म्हणजे सिद्धि ही सफाई कर्मचाऱ्याची मुलगी आहे. विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांचे मने जिंकली.
यानंतर देव घेंगट, रणवीर धवलपुरे, मोहित घेंगट, मोहित जावळे, अनुजा पाटील, आदर्श गोडाले, साक्षी गोडाले, भूमिका बडगुजर, दर्शना बाविस्कर, कनिष्का चव्हाण या विद्यार्थ्यांनी देशभक्ति पर गीत वर नृत्य सादर केले. तर आस्था घेंगट, मानवी जावळे, अक्षरा जावळे, वैष्णवी मेहरा, साक्षी मेहरा, शिवा मेहरा, प्रियांश वैष्णव, सोहम उपाध्ये, प्रतीक दिकवाल, माधव व्यास, संतोषी पाटील, दिशा उपाध्ये, दिव्यांशी राजपूत, संस्कृति उपाध्ये, ईशा उपाध्ये, परशिका चव्हाण या विद्यार्थ्यांनी फॅन्सी ड्रेसचे सादरीकरण केले. कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानचे सतीश जावळे, धनंजय सोनवणे, शारदा सोनवणे, धीरज जावळे, पूनम भाटिया, देवेंद्र जावळे, नकुल सोनवणे, सुलतान पटेल, प्रवीण तायड़े, प्रदीप घेंगट, संदीप घेंगट आदींनी परिश्रम घेतले. तर सूत्रसंचालन संस्थापक अध्यक्ष अविनाश जावळे यांनी केले.