जामनेर, दि. 26 – प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर जामनेर शहर पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बुधवारी संपन्न झाले. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन नगराध्यक्ष साधना महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान गिरीश महाजन यांनी पालकमंत्री यांच्याकडे पोलीस ठाण्यातील फर्निचर व पोलिसांसाठी नविन निवासस्थानांसाठी निधी मंजूर करावा अशी मागणी केली.
या संदर्भात पालकमंत्री पाटील यांनी सकारात्मकता दर्शवित सरकारकडे प्रस्ताव पाठवून पुरेसा निधी मंजूर करून आणण्याचे आश्वासन दिले. यावेळी पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे, चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पाचोरा उपविभागीय पोलीस उपअधीक्षक भारत काकडे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.