• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

उसनवारीचे पैसे मागितलेच्या रागातून महिलेच्या गळ्यावर ब्लेडने वार; संतप्त नागरिकांकडून संशयिताला चोप 

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 23, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव, प्रतिनिधी : पतीने मित्राला उसनवारीने दिलेले पाच हजार रुपये परत मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात संशयिताने महिलेच्या गळ्यावर धारदार ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना निवृत्तीनगरात मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) घडली. गायत्री राजेंद्र पाटील (वय ३८) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वार केल्यानंतर घटनास्थळीच थांबलेल्या संशयिताला संतप्त नागरिकांनी पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. सतिष मोतीलाल शिंदे (वय ४३, रा. मयुर सोसायटी) असे संशयिताचे नाव आहे.

निवृत्तीनगरात राहणाऱ्या गायत्री पाटील यांचे पती राजेंद्र पाटील यांनी काही वर्षांपूर्वी परिसरात राहणाऱ्या मित्र सतिष शिंदे याला पाच हजार रुपये उसनवारीने दिले होते. बरेच महिने उलटूनही शिंदे याने ही रक्कम परत केली नव्हती. दरम्यान, मंगळवारी गायत्री पाटील या घरी एकट्या असताना सतिष शिंदे त्यांच्या घरी आला. गेल्या आठवड्यातच शस्त्रक्रिया झाल्याचे सांगत गायत्री यांनी त्याच्याकडे पतीने दिलेले पैसे परत करण्याची मागणी केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला.

पैशांवरून वाद सुरू असतानाच सतिष शिंदे याने जवळ असलेल्या धारदार ब्लेडने गायत्री पाटील यांच्या गळ्यावर वार केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्या रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळल्या. त्यांनी आरडाओरड केल्याने घराच्या खालच्या मजल्यावर राहणाऱ्या जेठ-जेठाणी यांच्या लक्षात हा प्रकार आला.

आवाज ऐकताच त्यांनी तातडीने वरच्या मजल्यावर धाव घेतली. त्यावेळी गायत्री पाटील या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या. घटनेची माहिती राजेंद्र पाटील यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने पत्नीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

महिलेवर वार केल्यानंतर संशयित सतिष शिंदे घटनास्थळीच थांबून होता. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच त्यांनी पाटील कुटुंबीयांच्या घराकडे धाव घेत शिंदे याला पकडले. संतप्त नागरिकांनी त्याला चोप देत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांच्या ताब्यात संशयिताला देण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतिष शेवाळे यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळावरून धारदार चाकू जप्त केला आहे. सुरुवातीच्या चौकशीत संशयिताने आपण मित्र राजेंद्र पाटील यांच्या घरी मोबाईल चार्जिंग करण्यासाठी आलो असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, महिलेवर झालेला हल्ला आणि घटनास्थळी आढळलेले शस्त्र यामुळे पोलिसांकडून संशयिताची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Next Post
सेवा मंडळासमोरील विसर्जन मार्गावरील खड्ड्यांवरून महापौर दीपमाला काळे आक्रमक; मक्तेदाराला दूरध्वनीवरून धरले धारेवर..!

सेवा मंडळासमोरील विसर्जन मार्गावरील खड्ड्यांवरून महापौर दीपमाला काळे आक्रमक; मक्तेदाराला दूरध्वनीवरून धरले धारेवर..!

ताज्या बातम्या

गणेशोत्सवातून लोकसंवाद; पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत* *गणेश फेस्टिवल पोस्टल नाईट कॅम्पला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
खान्देश

गणेशोत्सवातून लोकसंवाद; पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत* *गणेश फेस्टिवल पोस्टल नाईट कॅम्पला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
वॉटर मीटरच्या सदोष कारभारावरून महापौरांनी केली कंत्राटदाराची कानउघाडणी
खान्देश

वॉटर मीटरच्या सदोष कारभारावरून महापौरांनी केली कंत्राटदाराची कानउघाडणी

September 23, 2026
सेवा मंडळासमोरील विसर्जन मार्गावरील खड्ड्यांवरून महापौर दीपमाला काळे आक्रमक; मक्तेदाराला दूरध्वनीवरून धरले धारेवर..!
खान्देश

सेवा मंडळासमोरील विसर्जन मार्गावरील खड्ड्यांवरून महापौर दीपमाला काळे आक्रमक; मक्तेदाराला दूरध्वनीवरून धरले धारेवर..!

September 23, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

उसनवारीचे पैसे मागितलेच्या रागातून महिलेच्या गळ्यावर ब्लेडने वार; संतप्त नागरिकांकडून संशयिताला चोप 

September 23, 2026
पोलिस असल्याची बतावणी करत वृद्ध व्यावसायिकाचे दागिने लंपास
गुन्हे

पोलिस असल्याची बतावणी करत वृद्ध व्यावसायिकाचे दागिने लंपास

September 23, 2026
भुसावळ एमआयडीसीतील NRJ Pharmachem कंपनीला भीषण आग
खान्देश

भुसावळ एमआयडीसीतील NRJ Pharmachem कंपनीला भीषण आग

September 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add