पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

पाळधी प्रतिनिधी पाळधी बायपास मार्गावर भरधाव कंटेनरचा ताबा सुटून तो पलटी झाल्याने झालेल्या अपघातात दोनगाव बुद्रुक (ता. धरणगाव) येथील किरण जनार्दन सोनवणे (२०) याचा मृत्यू झाला. किरण महाविद्यालयीन शिक्षण घेत होता.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रतापराव पाटील आणि विक्रम पाटील यांनीही घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला सहकार्य केले.

अपघातग्रस्त तरुणासाठी रुग्णवाहिका बोलावण्यात आली. प्रशासनाच्या मदतीने पुढील कायदेशीर आणि वैद्यकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली.
या घटनेची पोलिसांनी नोंद घेतली असून कंटेनरचा ताबा सुटण्यामागील नेमके कारण शोधले जात आहे. किरणच्या मृत्यूने दोनगाव बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.








