• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 27, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव, प्रतिक्रिया : येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर हृदयविकाराशी संबंधित पामी ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. हृदयविकार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या उपचारामुळे महिलेच्या हृदयाशी संबंधित गंभीर समस्येवर यशस्वीपणे उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे, संबंधित रुग्णाला शासकीय आरोग्य योजनेअंतर्गत उपचाराचा लाभ मिळाल्याने आर्थिक दिलासाही मिळाला.

थोरगव्हाण येथील ७२ वर्षीय महिला हृदयाशी संबंधित त्रासामुळे डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. याठिकाणी हृदयालयाचे विभागप्रमुख डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अली अदनान यांनी रुग्णाची तपासणी केल्यानंतर आवश्यक वैद्यकीय चाचण्या व तपासण्या केल्या. तपासणीच्या अहवालानुसार रुग्णाच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गंभीर अडथळा असल्याचे निदर्शनास आले. रुग्णाचे वय तसेच हृदयाची स्थिती लक्षात घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने पुढील उपचाराची दिशा निश्चित केली.

टीमच्या अथक प्रयत्नाला यश..
रुग्णावर पामी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्याधुनिक कॅथलॅबच्या सहाय्याने हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. अली अदनान, डॉ. झिशान सय्यद यांच्या टीमने ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या हृदयाची स्थिती सातत्याने निरीक्षणाखाली ठेवण्यात आली.

तज्ज्ञ डॉक्टर, भूलतज्ज्ञ, परिचारिका तसेच तांत्रिक कर्मचार्‍यांच्या समन्वयातून ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. वयोमान अधिक असूनही अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, अनुभवी हृदयविकार तज्ज्ञ आणि रुग्णालयातील प्रशिक्षित वैद्यकीय पथकामुळे उपचार यशस्वी झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. या उपचाराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रुग्णाला शासकीय आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रियेचा लाभ मिळाला.

▪️हृदयविकाराची लक्षणे दिसून आल्यास वेळ न दवडता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी छातीत दुखणे, धाप लागणे, घाम येणे, अस्वस्थपणा किंवा अचानक अशक्तपणा जाणवल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
– डॉ. अली अदनान, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.


 

Next Post
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

ताज्या बातम्या

एटीएसच्या नावाने शिक्षकाला ३२.४० लाखांचा चुना
गुन्हे

एटीएसच्या नावाने शिक्षकाला ३२.४० लाखांचा चुना

November 28, 2026
रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवात नाट्यसंगीत, अभंगवाणी आणि ‘बॉलीवूड घराना’ची मेजवानी
जळगाव जिल्हा

रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवात नाट्यसंगीत, अभंगवाणी आणि ‘बॉलीवूड घराना’ची मेजवानी

November 27, 2026
बोपदेव घाटात भीषण अपघात; जळगावच्या मोहिनीसह तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
खान्देश

बोपदेव घाटात भीषण अपघात; जळगावच्या मोहिनीसह तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

November 27, 2026
कजगावमध्ये तरुणावर अज्ञातांकडून गोळीबार; हल्ल्यात गंभीर जखमी, परिसरात खळबळ
गुन्हे

कजगाव गोळीबार प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

November 27, 2026
रझा कॉलनीत घरफोडी; दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
खान्देश

रझा कॉलनीत घरफोडी; दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

November 27, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

शिवशाही बसमध्ये महिलेच्या बॅगेतून ४.६३ लाखांचा ऐवज लंपास

November 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add