• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शिवरे येथील ग्रामसभेत ग्रामसेवकाशी वाद ; एका आरोपीस अटक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 18, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
शिवरे येथील ग्रामसभेत ग्रामसेवकाशी वाद ; एका आरोपीस अटक

पारोळा, प्रतिनिधी : तालुक्यातील शिवरे येथे आयोजित ग्रामसभेत शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या ग्रामसेवकावर वाद घालून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पारोळा पोलिसांनी अवघ्या काही तासांत एका मुख्य आरोपीला अटक केली आहे. या दुर्दैवी घटनेप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०५ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, १७ ऑगस्ट २०२६ रोजी शिवरे येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेदरम्यान शासकीय कामकाज पाहत असलेले ग्रामसेवक प्रल्हाद पाटील (वय ५२) यांच्याशी जुन्या बिलांच्या कारणावरून काही ग्रामस्थांनी हुज्जत घालत तीव्र वाद घातला. वादाचे रूपांतर थेट भांडणात होऊन सात जणांनी त्यांना शिवीगाळ केली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळून जात असताना ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी विलंब न लावता संबंधित सात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद क्रमांक ३१५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १०५ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अत्यंत वेगाने तपासाची चक्रे फिरवत या प्रकरणातील एका मुख्य आरोपीस तात्काळ अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

दरम्यान, मृत ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांच्या पार्थिवावर १८ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांच्या बोधर्दे (ता. पारोळा) या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. गावात कोणताही अनचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पारोळा पोलिसांकडून शिवरे व बोधर्दे परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Next Post
शिरसोलीतील घरफोडीचा छडा; एमआयडीसी पोलिसांकडून तीन संशयित ताब्यात

शिरसोलीतील घरफोडीचा छडा; एमआयडीसी पोलिसांकडून तीन संशयित ताब्यात

ताज्या बातम्या

भुलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न; खुल्या गटाच्या शहरी विभागात भैरवी ग्रुप प्रथम
जळगाव जिल्हा

भुलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न; खुल्या गटाच्या शहरी विभागात भैरवी ग्रुप प्रथम

October 3, 2026
एसआयआर प्रक्रियेत कागदपत्रे सादर करण्याची सुविधा
खान्देश

एसआयआर प्रक्रियेत कागदपत्रे सादर करण्याची सुविधा

October 3, 2026
मुंबई WIRC टीमची जळगाव सीए शाखेला भेट
खान्देश

मुंबई WIRC टीमची जळगाव सीए शाखेला भेट

October 3, 2026
आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन
खान्देश

आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

October 3, 2026
रिक्षात बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणारे तिघे जेरबंद
खान्देश

रिक्षात बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणारे तिघे जेरबंद

October 2, 2026
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना
जळगाव जिल्हा

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना

October 2, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add