• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

३०० रोपांची लागवडीसह ४ हजार सीड बॉलची पेरणी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 16, 2026
in Uncategorized, जळगाव जिल्हा
0
हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

जळगाव, प्रतिनिधी : हरित महाराोष्ट्र अभियानांतर्गत अनुभूती निवासी स्कूल, जळगाव वनविभाग आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व सीड्स बॉल पेरणी उपक्रम उत्साहात पार पडला. अनुभूती निवासी स्कूलच्या पाठीमागील राखीव वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४०७ येथे झालेल्या या उपक्रमात शाळेतील १८७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्थानिक वृक्षप्रजातींच्या ३०० रोपांची लागवड केली.

दरम्यान करंज, कांचन, बूच, बांबू, रिठा आदी वृक्षप्रजातींच्या ४ हजार सीड्स बॉलची पेरणी केली. राखीव वनक्षेत्रातील जैवविविधता वाढविणे, स्थानिक वृक्षप्रजातींचे संवर्धन करणे आणि पर्यावरण संरक्षणाला चालना देणे, हा उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. हा उपक्रम जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा अनिल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

वृक्षारोपणावेळी अनुभूती स्कूलचे प्राचार्य देबाशिष दास, विक्रांत जाधव, वनविभागाचे क्षेत्रीय अधिकारी स्वप्नील गोसावी, जैन इरिगेशनच्या वन व पर्यावरण विभागाचे राजेंद्र राणे, सुरक्षा अधिकारी एस. एस. भुसांडे, डॉ. समीर पवार, गार्डन विभागाचे संदीप पाटील, गिरीश जगताप, विठ्ठल बारी, शुभम काळे, अजय जाधव, आकाश कोळी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्यात आला. या उपक्रमामुळे राखीव वनक्षेत्रातील हरित आच्छादन वाढण्यासोबतच जैवविविधतेच्या संवर्धनाला चालना मिळणार असून, विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग आणि पर्यावरणाविषयीची जाणीव अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.

Next Post
मध्यरात्री घरात घुसले अन् आईला दिली मुलाच्या हत्येची धमकी; तिघे जेरबंद

मध्यरात्री घरात घुसले अन् आईला दिली मुलाच्या हत्येची धमकी; तिघे जेरबंद

ताज्या बातम्या

रिक्षात बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणारे तिघे जेरबंद
खान्देश

रिक्षात बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणारे तिघे जेरबंद

October 2, 2026
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना
जळगाव जिल्हा

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना

October 2, 2026
विकास दूध फेडरेशनमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवले आधुनिक ऑटोमेशनचे धडे
जळगाव जिल्हा

विकास दूध फेडरेशनमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवले आधुनिक ऑटोमेशनचे धडे

October 2, 2026
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन
जळगाव जिल्हा

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन

October 2, 2026
गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे
खान्देश

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

October 2, 2026
अनुभूती स्कूलच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाचे खो-खो स्पर्धेत विजेतेपद; अंतिम सामन्यात श्रीराम विद्यालयाचा पराभव
Uncategorized

अनुभूती स्कूलच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाचे खो-खो स्पर्धेत विजेतेपद; अंतिम सामन्यात श्रीराम विद्यालयाचा पराभव

October 2, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add